Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Mumbai Rain: पूर्व उपनगरात १२ तासात सर्वाधिक २१४.४४ मिमी पाऊसाची नोंद

Mumbai Rain: पूर्व उपनगरात १२ तासात सर्वाधिक २१४.४४ मिमी पाऊसाची नोंद

विक्रोळीत सर्वात जास्त पाऊस

Related Story

- Advertisement -

हवामान खात्याने दिलेल्या पूर्व इशाऱ्यानुसार मुंबईत बुधवारपासून सलग चार दिवस अतिवृष्टी होण्यास सुरुवात झाली. सकाळी ५ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरात सर्वाधिक २१४.४४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरात १९०.७८ मिमी आणि शहर भागात १३७.८२ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

विक्रोळीत सर्वात जास्त पाऊस

पूर्व उपनगरात विक्रोळी येथे सर्वात जास्त – २८५.९९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. चेंबूर – २८०.५२ मिमी, मानखुर्द, गोवंडी – २४८.५२ मिमी, घाटकोपर – २१०२२ मिमी तर कुर्ला परिसरात २३१.४५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

पश्चिम उपनगरात मरोळ येथे २७२.१९ मिमी पाऊस

- Advertisement -

पश्चिम उपनगरात मरोळ येथे सर्वात जास्त म्हणजे २७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर,अंधेरी (पूर्व) – २७१.७६ मिमी, मालवणी – २५३.८८ मिमी, गोरेगाव – २१७.३६ मिमी, अंधेरी ( प.) – २१५.०३मिमी,दहिसर -२०८.२२ मिमी, सांताक्रूझ – २०७.६४ मिमी, वर्सोवा – २०७.४४ मिमी, वांद्रे – ८६.९९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

शहर भागात कमी पाऊस

शहर भागात रावली कॅम्प परिसरात सर्वात जास्त म्हणजे २८२.६१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धारावी – २७६.९२ मिमी, दादर – २३७.९७ मिमी, माटुंगा – २३४.९३ मिमी, वरळी -१७३.९४ मिमी, मुंबई सेंट्रल – १४८.४९ मिमी, भायखळा – १२७.७४, मिमी, हाजीअली – १२४.१९ मिमी, नरिमन पॉईंट येथे ५३.२२ मिमी आणि कुलाबा येथे ५४.८५ मिमी इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Rain: मुंबई,ठाणे,पालघरला हवामान खात्याकडून आज Red Alert तर पुढील ४ दिवसांसाठी Orange Alert

 

 

- Advertisement -