घरमुंबईMumbai Weather : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, अंधेरी सबवे जलमय, हवामान विभागाचा...

Mumbai Weather : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, अंधेरी सबवे जलमय, हवामान विभागाचा हायअलर्ट

Subscribe

गेल्या काही तासांपासून मुंबईसह, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार पावसाने थैमान घातले असून येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये काही तासांपासून मुसळधार पावसाचा कहर सुरु असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कुर्ला, सांताक्रुज, अंधेरीसह बहुतांश भागांत रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना या पाण्यातून रस्ता काढणे अवघड झाले आहे. मुंबईत सतत पाऊस पडत राहिल्यास काही तासांतच मुंबईचे अवस्था बिकट होत आहे.

मुंबईत थोडावेळ तरी पाऊस पडला तरी रस्ते जलमय होत असून नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. त्यामुळे मुंबईकरांना दरवर्षी या मुसळधार पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. यात १३ आणि १४ जूनलाही मुंबईत मुसळधार पावसामुळे हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

हवामान खात्याने दिला अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याने मुंबई व आसपासच्या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने (आयएमडी) महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात १३ जूनपासून मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. आयएमडीने सांगितले की, मुंबई व शेजारील ठाण्यातील काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस पडेल. आयएमडीच्या प्रादेशिक हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज, म्हणजेच शनिवारी असाच इशारा देण्यात येत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, २४ तासांत २०४.५५ मिमी पेक्षा जास्त पाऊस हा अतिवृष्टीचा पाऊस मानला जातो.

- Advertisement -

प्रशासन अ‍ॅलर्ट मोडवर

मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने एनडीआरएफच्या १५ तुकट्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी ट्विट केले, की रत्नागिरी येथे ४ विविध दलाच्या ४ तुकड्या तर मुंबई, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि ठाण्यात प्रत्येकी दोन आणि कुर्ल्यात १ तुकडी तैनात करण्यात आली आहे.

बीएमसीने समुद्रापासून दूर राहण्याची केली सूचना

भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या म्हणण्यानुसार, १३- १४ जून रोजी दोन दिवसांच्या कालावधीत मुंबई शहर व उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नारिकांना समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -