घरमुंबईपावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प; बाहेरगावच्या रेल्वे रद्द

पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प; बाहेरगावच्या रेल्वे रद्द

Subscribe

पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने आज सकाळीच मुंबईतील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यात ठराविक स्टेशनदरम्यान धावत आहेत. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असून अनेकांनी स्टेशनवरून माघारी जाणे पसंत केले आहे. तर काही जण ठाणे, कल्याण, दादर, स्टेशनवर अडकून पडले आहेत.

दरम्यान पाणी ओसरेपर्यंत रेल्वे वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. आवश्यकता असेल तरच प्रवास करा अशा सूचना रेल्वेकडून देण्यात येत आहेत.

- Advertisement -

असे आहेत बदल

मध्य रेल्वे मार्ग : ठाणे ते कसारा, कर्जत आणि खोपोलीपर्यंत ट्रेन सुरू आहेत.

हार्बर रेल्वे मार्ग : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे दरम्यान आणि वाशी ते पनवेल दरम्यान.

- Advertisement -

ट्रान्स हार्बर मार्ग : ठाणेवाशीपनवेल दरम्यान

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

11139 मुंबईगदग एक्सप्रेस
11140 गदग मुंबई एक्स्प्रेस
12110/12109 मनमाड मुंबईमनमाड पंचवटी एक्स्प्रेस
11010/11009 पुणे मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस
12124/12123 पुणे मुंबई पुणे डेक्कन क्विन
11023 मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस

या गाड्या निम्म्याहून माघारी जाणार

17412 कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस – पुण्यापर्यंतच धावणार आणि पुन्हा पुण्याहून कोल्हापूरला जाणार.

12116 Solapur-Mumbai Siddheshwar Express दौडपर्यंतच धावणार असून तेथूनच ती पुन्हा सोलापूरकडे रवाना होईल.

11301 Mumbai-Bengaluru Udyan Express दौडवरून मार्गस्थ होणार आहे.

11140 Gadag-Mumbai Express पुण्यापर्यंतच धावेल.

22886 Tatanagar-LTT Antyodaya Express JCO इगतपुरीपर्यंत धावणार असून तेथून ती पुन्हा 22885 LTT-Tatanagar Antyodaya Expमार्गस्थ होणार आहे.

12112 Amravati-Mumbai Expressदेवळालीपर्यंत थांबवली असून तेथून ती पुन्हा माघारी मार्गस्थ होईल.

11024 Kolhapur-Mumbai Sahyadri Express साताऱ्यापर्यंत धावणार आहे.

11020 Bhubaneshwar-Mumbai Konark Express कामशेतपर्यंत धावणार असून तेथून ती पुन्हा माघारी मार्गस्थ होईल.
16382 Kanyakumari-Mumbai Express तळेगाव पर्यंत धावणार असून तेथूनच ती माघारी परतेल.
12702 Hyderabad-Mumbai Express पुण्यापर्यंत धावणार असून तेथून ती पुन्हा हैद्राबादकडे मार्गस्थ होईल.
12164 Chennai-Dadar Chennai Express पुण्यापर्यंत धावणार असून तेथून ती माघारी फिरणार आहे.
11006 Puducherri-Dadar Express पुण्यापर्यंत धावणार असून तेथून ती पुन्हा माघारी फिरेल.

22108 Latur-Mumbai Express दौड पर्यंत थांबविण्यात आली असून तेथून माघारी वळेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -