घरमुंबईदादर पुणे एसटी सुरू; रायगडमधून फेऱ्या बंद

दादर पुणे एसटी सुरू; रायगडमधून फेऱ्या बंद

Subscribe

मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्या तरी, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाने दिलासा दिला आहे. दादर ते पुणे शिवनेरी बसच्या सकाळपर्यंत १३ फेऱ्या झाल्या असून प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने गाड्यांची वारंवारता कमी केली आहे. सायन सर्कलजवळ पाणी आल्याने परळ बस स्थानकातून मुंबईच्या बाहेर जाणारी वाहतूक वडाळा मार्गे सुरू आहे.

दरम्यान रायगड जिल्ह्यातील पावसामुळे एसटी बसवर परिणाम झाला आहे. रायगड जिल्ह्यातील पालीनागोठणे या मार्गावरील पुलावर पाणी आल्याने हा मार्ग सध्या एसटी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

सूर्यनगरी येथून सुरतकडे आज सकाळी पहिली बस मार्गस्थ झाली. रेल्वे रद्द झाल्याने या मार्गावर विशेष बस सोडण्यात आल्या.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा व अर्नाळा आगारात सूर्या धरणातून सोडलेले पाणी साचल्याने या आगारातील सकाळपासून एक ही बस फेरी सुटलेली नसल्याचे समजते.

कर्नाटक एसटी महामंडळाने बंगळूर मुंबई आणि बंगळूर पुणे या फेऱ्या रद्द केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -