Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई राणीच्या बागेत नव्या पाहुण्यांचे आगमन, पेंग्विनने दिला पिल्लांना जन्म

राणीच्या बागेत नव्या पाहुण्यांचे आगमन, पेंग्विनने दिला पिल्लांना जन्म

डोनाल्ड आणि डेसी या जोडीने एकच अंडे दिले होते आणि 1 मे 2021 रोजी हे नवजात पिल्लू जन्मले आहे

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीच्या बागेतील) हम्बोल्ट पेंग्विन सुविधेत सध्या तिन नर आणि चार मादी पेंग्विन आहेत. आणि त्यापैकी दोन प्रजनन जोड्यांनी यशस्वीपण प्रजनन केले असून मादाने एका नवजात पेंग्विनला जन्म दिला आहे. त्या नवजात पिल्लू पेंग्विनचे नाव ओरिओ असे ठेवण्यात आले आहे. डोनाल्ड आणि डेसी या जोडीने एकच अंडे दिले होते आणि 1 मे 2021 रोजी हे नवजात पिल्लू जन्मले आहे. याचप्रमाणे हे पिल्लू नर असल्याची माहिती देण्यात आली आहे

ओरिओ आता ४ महिन्यांचा असून प्रामुख्याने आई-वडिलांसोबत राहून आणि पालकांनी हळूहळू समुहाची ओळख करून दिल्यामुळे तो आता समूहात उत्तमरित्या मिसळला आहे. इतर पेंग्विनच्या हल्ल्यापासून पालकांनी त्याला स्वत:चे संरक्षण करण्यास शिकवले आहे.तसेच आजकाल ओरिओ त्याच्या घरट्यात न जाता मुख्यत: बबल या मादी पेंग्विनसोबत वेळ घालवतो आणि प्रदर्शनी परिसरात फिरतो.ओरिओला आता किशोरवयीन पेंग्विनसारखे आवरण (Juvenile Coat) आले असून सुमारे एक वर्षाचा होईपर्यंत त्याला प्रौढ पेंग्विनप्रमाणे आवरण (adult coat) येईल.ओरिओ आता आहारामध्ये मासे खात असून त्याला कोणत्याही विशेष आहाराची गरज भासत नाहीये.

- Advertisement -

पालकांनी ओरिओचे पूर्णपणे संगोपण केले आहे आणि प्राणि संग्राहलयाच्या टीम दररोज 2-3 तासांनी पालकांना आहार देऊन ओरिओच्या संगोपनात मदत करत असे. तसेच दररोज सकाळी पिल्लाचे वजन तपासून त्यानुसार त्याला पूरक आहाराची आवश्यक्ता आहे का याची देखील काळजी घेतली जाते आहे.

- Advertisement -

मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने एकच अंड दिले असून १९ ऑगस्ट २०२१ रोजी हे नवजात पिल्लू जन्माला आले.हे पिल्लू फक्त २५ दिवसांचे असून पालक त्याचे संपूर्णपणे संगोपन करीत आहे. त्याची लिंग तपासणी अद्याप करण्यात आलेली नाही. वयाच्या तीन महिन्यांपर्यंत, रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्याने पिल्ले आजारांना बळी पडू शकतात. म्हणून प्राणीसंग्रहालयाच्या टीमकडून त्यांची अत्यंत काळजी घेतली जात आहे.


हे हि वाचा – महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईत ‘निर्भया’ पथकांची स्थापना

 

- Advertisement -