घरमुंबईलॉकडाऊनसाठी मुंबईतील यंत्रणा सज्ज! - अस्लम शेख

लॉकडाऊनसाठी मुंबईतील यंत्रणा सज्ज! – अस्लम शेख

Subscribe

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाड्याने वाढत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यातच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही रुग्णालय यंत्रणा सज्ज असल्याचे म्हणत पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. पालकमंत्री अस्लम शेख यांनी जाहिर पत्रकार परिषेद घेत मुंबईतील एकंदरीत रुग्णालयांच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

याबाबत बोलताना अस्लम शेख म्हणाले की, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्यात कमी पडत नाही. आज मुंबईत जरी कोरोना रुग्ण वाढत असले तरी उपचारांसाठी पाहिजे तेवढी जागा उपलब्ध आहे. मग ते महानगरपालिकेचे रुग्णालय असो वा राज्य सरकारचे रुग्णालय असो. तसेच खासगी रुग्णालयातही मुबलक जागा आहे. १६ हजारपेक्षा जास्त रुग्णालय आज महानगरपालिकेकडे आहेत. यात ४ हजार बेड्स अजून शिल्लक आहेत. आयसीयु, व्हेंटिलेटरर्समध्ये जागा आहेत. याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेडस् सरकारने आरक्षित ठेवले आहेत. आजच्या दिवशी ८० खासगी रुग्णालयांना पालिकेने आपल्या ताब्यात घेतले आहे. असे म्हणत अस्लम शेख यांनी लॉकडाऊनच्या तयारीचे संकेत दिले आहेत.

- Advertisement -

तसेच लसीकरण मोहिम व्यवस्थित सुरु आहे. महाराष्ट्र शासन आणि पालिकेच्या जंम्बो कोव्हिड वॅक्सीनेशन सेंटरमध्ये अनेक श्रीमंत नागरिक लसी घेऊन जात आहेत. त्यामुळे मला नाही वाटत लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र शासन आणि पालिका कुठे कमी पडतेयं. काही जंम्बो सेंटर रुग्ण कमी होत असल्याने बंद केले होते. परंतु आत्ताही रुग्ण वाढल्यास तयारीत ठेवले आहेत. म्हणजे कधीही त्या सेंटरची आवश्यकता लागल्यास त्याचा वापर करु शकतो. सध्याची स्थिती अशी आहे की, आमच्याकडे ४ हजार बेड्स रिकामी आहेत आणि ४ हजार बेड्स आरक्षित ठेवले आहेत. त्यामुळे नवीन जंम्बो कोव्हिड सेंटर उभारण्याची गरज सरकारला वाटत नाही. असेही अस्लम शेख म्हणाले.

राज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने मुख्यमंत्री लॉकडाऊन करण्याबद्दल बोलत आहेत परंतु राष्ट्र्वादी म्हणतेय लॉकडाऊनची आवश्यकता नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत लॉकडाऊनबद्दल दुमत निर्माण झाले आहे. यावर काँग्रेसचे भूमिका स्पष्ट करत शेख म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे सांगितले त्यात दोन मत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, तुम्ही लॉकडाऊनसाठी तयार रहा, तर राष्ट्रवादी सांगतेय की, सध्यातरी लॉकडाऊनची गरज नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तयारीत रहा म्हणजे लॉकडाऊन लावणार असे नाही. पण परिस्थिती अशीच वाढत राहिली तर जगातील आकडेवारी पाहू शकता. आजही अमेरिकेत रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊनची स्थिती आहे. लंडनमध्येही दोन महिनेपेक्षा अधिक वेळा झाला लॉकडाऊन उचलले गेले नाही. युरोपीन देश, स्पेन, इटली सारख्या देशांमध्येही ठरावीक जागांमध्ये लॉकडाऊन काढण्यात आले आहे तर ठरावीक जागांमध्ये २४ तासांचा लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, सध्या लोकांसमोर मोठा प्रश्न हाच आहे की, मुंबई आणि महाराष्ट्रामध्येच कोरोना केस वाढत आहे. तर दुसऱ्या राज्यात कोरोना केस वाढत नाहीत. म्हणून आम्ही आयसीएमआरला पत्र लिहित की, मुंबई आणि महाराष्ट्रातचं कोरोना केस का वाढत आहे?. पण मुंबई आणि महाराष्ट्रात वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. पण मला प्रश्न पडला आहे की, महाराष्ट्र आणि मुंबईतच केसेस का वाढत आहे?. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा निवडणुक प्रचारासाठी मोठे कॅम्पेनिंग सुरु आहे. लाखोच्या संख्येने लोक जमत आहेत. अशीच परिस्थिती इतर राज्यांमध्ये सुरु आहे. असे म्हणत त्यांनी भाजपावर अप्रत्यक्ष टोला लागावला.

राज्यातील लॉकडाऊनवर बोलताना अस्लम शेख म्हणाले की, राज्यात आता ज्याप्रकारे नाईट कर्फ्यू लावला त्याप्रमाणे आता मार्केट, एपीएमसी मार्केट, शॉपिंग मॉल्सवरही काय निर्बंध लावता येतील यावर विचार सुरु आहे. तसेच बस स्टँड, रेल्वे तिकिट काउंटर, किंवा रेल्वेची संख्या कमी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात आले आहे. त्यामुळे टास्क फोर्स ज्याप्रमाणे सुचना देणार त्याप्रमाणे सरकार पाऊल उचलणार आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणींवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शेख म्हणाले, मागच्या वेळच्या लॉकडाऊनला कोणीही तय़ार नव्हते. पण तुम्ही पाहिले, मुंबईतून लाखो कामगार आपल्या मुळ गावी स्थलांतर करत होते त्यांना महाराष्ट्र सरकारने काही कमी पडू दिले नाही. त्यांची जेवनाची सोय आणि इतर सोयींसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले. नुकसान संपूर्ण जगात झाले. अमेरिका आणि इतर देशांनी नागरिकांना या दरम्यान मदत केली, परंतु आपल्या देशात एवढ्या प्रमाणात पैशांची प्रोव्हिजन नव्हती म्हणून काय देण्यात आले नाही. पण लोकांचे नुकसान होऊन नये यासाठी आम्ही लॉकडाऊनच्या मानसिकतेत नाही.

‘कोरोना आल्यापासून भाजपा सरकारला अडचणीत आणतंय’

भाजपाशी कोरोनाला घेऊन काही वाटत नाही. जेव्हापासून महाराष्ट्रात कोरोना संसर्ग सुरु झाला तेव्हापासून महाराष्ट्र सरकारला कसे पाडायचे त्यामध्येच भाजपाने लक्ष दिले आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढत असतानाही भाजपा सांगत होता ट्रेनच सुरु करा, मॉलचं सुरु करा, हे करा, ते करा, पण आता रुग्ण वाढत असताना त्यांनी रुग्णांची चिंता नाही की बाबा हॉस्पीटलायजेशनमध्ये काही कमतरता, किंवा कोणाला काय अॅब्युलन्समध्ये काही अडचणी याबाबत भाजपाची चर्चा नाही. तर त्यांची चर्चा यावरच की, काय बंद करा, काय चालू करा, हिंदू-मुस्लिम. अशी टीका अस्लम शेख यांनी भाजपावर केली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -