Mumbai Corona Update: मुंबईत आज १ हजार १२१ रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: 545 corona cases recorded in 24 hours in Mumbai
Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या पुन्हा रेकॉर्डब्रेक करत आहे. मुंबईत आज एकूण १ हजार १२१ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत एकूण ७३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. परंतु फेब्रुवारीपासून रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली. परंतु यापैकी केवळ १५० ते २०० रुग्णच पालिकेच्या कोविड केअर सेंटर्समध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत.

आजपर्यंत मुंबईत ३ लाख ६ हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३ टक्के इतके आहे. तर मुंबईतील दुप्पटीचा दर २३५ दिवसांवर पोहचला आहे. २४ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंतचा एकूण कोरोना वाढीचा दर ०.२९ टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.


हेही वाचा- Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णांची होम क्वारंटाईनला पसंती!