घरक्राइमSakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, ACP ज्योत्सना...

Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, ACP ज्योत्सना रासम करणार तपास

Subscribe

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार प्रकरणाचा तपास (Mumbai Sakina Rape case) सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम (ACP Jyotsna Rasam) करणार आहेत. तसंच, आतापर्यंतच्या तपासात एकच आरोपी असल्याचं निष्पन्न झाल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं. (Mumbai Police Commissioner Hemant Nagarale) तसंच, आरोपी मोहन चौहान या नराधमाला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुननावली आहे. हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

“साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. तपास पूर्ण करुन एका महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू,” असं मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं.

- Advertisement -

दुर्दैवाने महिलेचा जबाब नोंदवता आला नाही

“साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही.ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आरोपपत्र दाखल केलं जाईल,” असं हेमंत नगराले यांनी सांगितलं.

फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

- Advertisement -

साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो  आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -