घरमुंबईराणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे - मुंबई सत्र न्यायालय

राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे – मुंबई सत्र न्यायालय

Subscribe

राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे मुंबई सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणांना दिलेल्या जामीनाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली. यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या नोटीसनंतर राणा घराबाहेर पडले नाहीत. राणा दाम्पत्याना अटक होण्यापूर्वीच त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचे आंदोलन मागे घेतले होते. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे, असे मत मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या जाहीर घोषणेवरून झालेल्या वादानंतर राणा दांपत्याला अटक करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने राणा दांपत्याला जामीन दिला होता.

- Advertisement -

दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तपासात कोणतेही अडथळे आणू नये. घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही. कोर्टाने राणा दाम्पत्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही, अशा अटी न्यायालया राणा दाम्पत्याला घातल्या आहेत.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. कारागृहातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा यांची तब्येत खालावली असून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळत नाही, तोपर्यंत राणा दांपत्य मुंबईतच थांबणार आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -