घरताज्या घडामोडीराष्ट्रीय विज्ञान स्पर्धेत मुंबईचा झेंडा

राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेत मुंबईचा झेंडा

Subscribe

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान परिषदेत मुंबईच्या ९ शाळांतील १८ बाल संशोधकांनी सुवर्ण कामगिरी करत सुवर्ण पदकांची लयलुट केली आहे.

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान परिषदेत मुंबईच्या ९ शाळांतील १८ बाल संशोधकांनी सुवर्ण कामगिरी करत सुवर्ण पदकांची लयलुट केली. केरळमधील थिरूअनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत मुंबईतील ९ प्रकल्पांची निवड झाली होती. मागील २० वर्षातील राष्ट्रीय स्तरावर जाण्याचा मुंबईचा हा उच्चांक होता. राष्ट्रीय स्तरावरील बाल विज्ञान परिषदेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या या बाल संशोधकांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.

९ शाळेतील १८ विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्णपदके

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये ‘स्वच्छ, हरित आणि आरोग्यसंपन्न राष्ट्रासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पना’ या मुख्य विषयावर बाल वैज्ञानिकांनी संशोधनात्मक प्रकल्प बनवले होते. देशातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे प्रकल्प आले होते. यामध्ये मुंबईतील नऊ शाळांमधील १८ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये पश्चिम मुंबईतील बोरिवलीतील आर.सी.पटेल शाळेतील उजाला यादव, शेठ.जी.एच हायस्कुलमधील आदित्य गुप्ता, सेंट जॉन्स हायस्कुलमधील गणेश कुशवाह, उत्तर मुंबईतील मुलुंड येथील जे.जे अकादमीमधील योहान ठाकूर, भांडुपच्या कॉसमॉस हायस्कुलमधील मुदित मिश्रा, विक्रोळीतील गोदरेज उदयाचल हायस्कुलमधील दोन प्रकल्पांतर्गत इशाना चंद्रा, आणि शॉन केविन, चेंबूरमधील श्री सनातन धर्म हायस्कुलची स्नेहा कुंदर त्याचप्रमाणे माटुंगा येथील डॉन बॉस्को हायस्कुलमधील अथर्व गजकोश या विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प या परिषदेत सादर केले होते. मुलुंड येथील जे. जे.अकॅडमी या शाळेचा ‘परंपरागत घरगुती आरोग्यपेयांची निर्मिती’ हा लहान गटातील विज्ञान प्रकल्प महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने निवडला गेला होता. त्याच प्रकल्पाची देशातील वैज्ञानिक क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणार्‍या इंडियन सायन्स काँग्रेस या मोठ्या शास्त्रज्ञांच्या परिषदेसाठी निवड झाली आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय विज्ञान परिषदेत उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदके मिळवणार्‍या या बाल संशोधकांचा गौरव राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या मुंबई विभागातर्फे २७ फेब्रुवारीला सकाळी ८.३० ते १.३० या वेळेत एस एम शेट्टी हायस्कूल, हिरानंदानी गार्डन्स, पवई येथे करण्यात येणार आहे. विज्ञान दिनाच्या निमित्ताने आंतर शालेय विज्ञानगीत गायन स्पर्धा, विज्ञान पोस्टर स्पर्धा, विज्ञान घोषवाक्ये स्पर्धा आणि विज्ञान रंजक प्रयोग स्पर्धा घेतल्या होत्या. त्यांचे प्रदर्शन आणि बक्षिस वितरणही यावेळी होणार आहे. या कार्यक्रमाला राजीव गांधी विज्ञान आयोगाचे सचिव आणि सदस्य डॉ. अनिल मणेकर, बीएआरसीचे वरिष्ठ विज्ञान अधिकारी डॉ. संतोष टकले, महापौर किशोरी पेडणेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. माची प्राचार्य बी. बी. जाधव आणि प्राचार्या सीमा शेख हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.


हेही वाचा – पालिकेच्या आयसीएसई, सीबीएसई शाळांची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -