Homeताज्या घडामोडीKaamya Karthikeyan : मूर्ती लहान, पण कीर्ती महान! वयाच्या 17 व्या वर्षी...

Kaamya Karthikeyan : मूर्ती लहान, पण कीर्ती महान! वयाच्या 17 व्या वर्षी मुंबईच्या मुलीची जगातील 7 उंच शिखरे सर

Subscribe

जगात सर्वात उंच शिखर सर करण्याचा विक्रम जवळपास 2000 हून अधिक व्यक्तींच्या नावावर आहे. यामधील अनेकांच्या नाववर कोणत्याना कोणत्या विक्रमांची नोंद आहे. अशात मुंबईतील एका 17 वर्षीय मुलीने शिखरे सर करण्यात अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.

मुंबई : जगात सर्वात उंच शिखर सर करण्याचा विक्रम जवळपास 2000 हून अधिक व्यक्तींच्या नावावर आहे. यामधील अनेकांच्या नाववर कोणत्याना कोणत्या विक्रमांची नोंद आहे. अशात मुंबईतील एका 17 वर्षीय मुलीने शिखरे सर करण्यात अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. काम्या कार्तिकेयन असं या मुलीचं नाव असून जगातील सात खंडातील सात उंच शिखरे सर केली आहेत. विशेष म्हणजे सात खंडातील सात शिखरे सर्वात लहान वयात सर करणारी काम्या ही पहिली मुलगी ठरली आहे. (mumbai teen kaamya karthikeyan is the youngest girl to climb worlds 7 highest peaks)

काम्या कार्तिकेयन हिने केलेल्या कामगिरीचे भारतीय नौदलाने कौतुक केले आहे. भारतीय नौदलाने एक्सवर पोस्ट शेअर करत काम्या हिच्या कामगिरीची माहिती दिली. तसेच, काम्या आणि तिच्या वडिलांचे अभिनंदन केले आहे. शिवाय, भारत आणि नौदलासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. काम्याचे वडील एस. कार्तिकेयन हे नौदलात कमांडर पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबरीने काम्याने अंटार्क्टिका खंडातील १६,०५० फूट उंचीचे शिखर सर केली आहेत.

- Advertisement -

काम्या कार्किकेयन हिने वयाच्या १३ व्या वर्षी काम्याने गिर्यारोहणाची मोहीम सुरू केली. तिने आतापर्यंत आफ्रिकेतील माउंट किलीमांजारो, युरोपमधील माउंट एलब्रस, ऑस्ट्रेलियातील माउंट कोशियस्को, दक्षिण अमेरिकेतील माउंट एकोनकाग्वा, उत्तर अमेरिकेतील माउंट डेनाली, आशियातील माउंट एव्हरेस्ट आणि आता अंटार्क्टिका खंडातील माउंट विन्सन हे शिखर सर केले. दरम्यान, 24 डिसेंबर रोजी अंटार्क्टिकातील ‘माउंट विन्सन’ हे सर्वोच्च शिखर तिने सर करत गिर्यारोहण क्षेत्रात स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला. त्याचप्रमाणे माउंट विन्सनची चढाई करून काम्याने सेव्हन समिट हे आव्हान पूर्ण केले.

- Advertisement -

कोण आहे काम्या कार्तिकेयन?

मुंबईतील नौदलाच्या न्यू चिल्ड्रन स्कूल या शाळेत काम्या कार्तिकेयन शिक्षण घेत आहे. काम्याला गिर्यारोहण क्षेत्राची आवड आहे. तिने वयाच्या सातव्या वर्षी उत्तराखंडमध्ये पहिला ट्रेक केला होता. त्यानंतर आता सात खंडातील सात शिखरे सर करत आपल्या नावे अनोखा विक्रमाची नोंद केली. दरम्यान, काम्याच्या या कामगिरीचं तिच्या शाळेनेही कौतुक केले आहे. “इयत्ता बारावीत शिकणाऱ्या काम्याने सर्व अडथळे पार करत नवी उंची गाठली आहे. एनसीएस शाळेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे”, असं शाळेने केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.


हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची नव्या विक्रमाला गवसणी; दिग्गज गोलंदाजांना टाकलं मागे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -