घरमुंबईमुंबईत लोकलमधला AC झाला बंद, प्रवासी संतापले; 'या' एसी लोकल आज...

मुंबईत लोकलमधला AC झाला बंद, प्रवासी संतापले; ‘या’ एसी लोकल आज केल्या रद्द

Subscribe

मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक, आरामदायी आणि सुरक्षित व्हावा यासाठी एसी लोकल सुरू करण्यात आलेली आहे. मात्र गेल्या दोन दिवसात एसी लोकलमध्येच बिघाड झाल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे मुंबई लोकल. अगदी भल्या पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत ती धावत असते. लाखो मुंबईकर यामधून प्रवास करत आपल्या कामाचं ठिकाण गाठतात. लोकलची गर्दी मुंबईकरांसाठी नवी नाहीये. याच गर्दीसाठी पर्याय काढत एसी लोकलही सुरु करण्यात आल्या. मात्र मुंबईकरांची प्रवासी संख्या इतकी आहे की, ती एसी लोकही पूर्णपणे भरलेली असते. त्यात तापमानात वाढलेल्या उकाड्यात एसी लोकलमध्ये बसल्यानंतर जो गारवा मिळतो, त्याचा आनंद काही निराळाच…पण एसी लोकलमध्ये गारवा तर सोडाच पण खचाखच भरलेल्या गर्दीत जीव घुसमटू लागल्याचा भयानक अनुभव लोकांना मिळाला.

गुरूवारी मध्य रेल्वेवर कळवा मुंब्रा दरम्यान एसी लोकल मध्येच थांबली आणि तिचे दरवाजाही उघडत नसल्याची घटना घडली होती. भरीस भर म्हणून या एसी लोकलमधली एसी सुद्धा बंद पडली. या घटनेला अवघे २४ तासही उलटले नाहीत तर पुन्हा एकदा पश्चिम रेल्वेवर अशीच घटना घडली. मुंबईतील विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमधील एसी अचानक बिघडल्याने प्रवाशांचे एकच हाल झाले. एकीकडे बाहेर उकाडा असून एसीमध्ये जो गारवा मिळणार या आशेने लोकलमध्ये प्रवासी चढले खरे…पण एसी लोकलने या प्रवाश्यांचा चांगलाच हिरमोड केलाय. यावेळी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ देखील घालता.

- Advertisement -

प्रवाशांच्या गोंधळामुळे वसई, भाईंदर आणि मीरा रोडला ही एसी लोकल वारंवार थांबवली जात आहे. एसी लोकल वारंवार थांबवल्याने इतर लोकलच्या वाहतुकीवर त्यांचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या एसी लोकलमध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला इतकेच नाही तर पश्चिम रेल्वच्या ७ एसी लोकल रद्द करण्यात आल्यात. ७ गाड्या रद्द केल्याने दुपारच्या वेळीच एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. दरम्यान एसी लोकलचे वेळापत्रक बिघडल्याने आज एसी लोकल रद्द करण्यात आली आहे.

कोणत्या आहेत रद्द झालेल्या एसी लोकल?
VR94012 EX VR – 07.15
VR94017 EX CCG – 08.53
VR94026 EX VR – 10.20
VR94031 EX CCG – 11.48
VR94038 EX VR – 13.18
VR94043 EX CCG – 14.53
VR94052 EX VR 16.20

- Advertisement -

मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक, आरामदायी आणि सुरक्षित व्हावा यासाठी एसी लोकल सुरू करण्यात आलेली आहे. मात्र गेल्या दोन दिवसात एसी लोकलमध्येच बिघाड झाल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. सुविधा असूनही त्याचा वापर केला नाही तर अशा सुविधांचा काय उपयोग असा सवाल देखील काही प्रवाश्यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -