घरताज्या घडामोडीपहिल्या तीन दिवसात ९७ लाख प्रवाशांचा लोकल प्रवास,वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

पहिल्या तीन दिवसात ९७ लाख प्रवाशांचा लोकल प्रवास,वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Subscribe

मुंबईची लाइफ लाईन सुरु होताच लोकांना लोकलला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु झाल्यानंतर पहिल्या ३ दिवसात तब्बल ९७ लाख लोकांनी लोकलने प्रवास केल्याचे चित्र समोर आले आहे.

कोरोनाच्या काळात ठप्प झालेली मुंबईची लाइफ लाईन कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. टप्या टप्प्याने लोकल सेवा सुरु करण्यात आली. सर्वसामान्य लोकांनाही लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेल्वेने दिलेल्या वेळेत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार आहे. मुंबईची लाइफ लाईन सुरु होताच लोकांना लोकलला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु झाल्यानंतर पहिल्या ३ दिवसात तब्बल ९७ लाख लोकांनी लोकलने प्रवास केल्याचे चित्र समोर आले आहे. बुधवारी ३३ लाख लोकांनी लोकलने प्रवास केला होता. यात सेंट्रल रेल्वे मार्गावर २ लाख लोकांनी लोकलने प्रवास केला तर वेस्टर्न रेल्वेवर १३ लाख लोकांनी प्रवास केला. मंगळवारी ३२ लाख लोकांनी लोकलने प्रवास केला आहे. त्याचबरोबर सोमवारी तब्बल ३४ लाख लोकांनी लोकल प्रवास केल्याचे दिसून आले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे २३ मार्च रोजी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या आधी दररोज ८ मिलीयन लोक लोकलने प्रवास करत होते. लॉकडाऊनंतर १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेव सुरु करण्यात आली. सकाळी पहिली लोकल ते सकाळी ७ वाजेपर्यंत त्यानंतर दुपारी १२ ते ४ आणि रात्री ९ ते शेवटची लोकल यावेळेतच सर्वसामान्य प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार आहे. मात्र ही वेळ प्रवाशांच्या सोयीची नाही, लोकलच्या वेळापत्रकात बदल  करण्याची मागणी करण्यात येत आहे. लोक आपल्या जबाबदारीने प्रवास करत आहेत. ठाणे आणि बोरिवलीच्या प्रवाशांना हा वेळ अजिबातच योग्य नाहीय. दुपारी १२ ते ४ या वेळेपेक्षा सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत लोकल सुरु करावी. त्याचबरोबर रात्री ८ ते सकाळी पहिल्या ट्रेन पासून सकाळी ८ पर्यंत लोकलची वेळा बदलण्यात याव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करु अशी माहिती रेल्वे परिषद अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी दिली.

- Advertisement -

लोकलने प्रवास करताना लोकांना दिलेले सर्व नियम पाळूनच लोकले प्रवास करता येणार आहे. लोकलने प्रवास करताना मास्क लावणे अनिवार्य आहे. मास्क न लावल्यास नियमानुसार २०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. बुधवारी वेस्टर्न रेल्वेवर सुमारे २२६ प्रवाशांना विनामास्क प्रवास केल्याने दंड आकारण्यात आला. तर सेंट्रेल रेल्वेवर १८७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत एकूण ३७ हजार ४०० लोकांवर मास्क न घातल्याने कारवाई करण्यात आली आहे.


हेही वाचा – बेफिकीर मुंबईकरांचा विनामास्क लोकल प्रवास; पहिल्याच दिवशी ५०० प्रवाशांवर कारवाई

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -