घरताज्या घडामोडीमुंबईतील भायखळ्यात दोन शिवसैनिकांवर प्राणघातक हल्ला

मुंबईतील भायखळ्यात दोन शिवसैनिकांवर प्राणघातक हल्ला

Subscribe

दोन शिवसैनिकांवर हल्ला केल्याच धक्कादायक घटना मुंबईत घडली. शिवसेनेचे भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर आणि उपविभाग प्रमुख विजय कामतेकर यांच्या कारला अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केल्याचे समजते. गुरूवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला.

दोन शिवसैनिकांवर हल्ला केल्याच धक्कादायक घटना मुंबईत घडली. शिवसेनेचे भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर आणि उपविभाग प्रमुख विजय कामतेकर यांच्या कारला अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केल्याचे समजते. गुरूवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. सुदैवानं या हल्ल्यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, हा हल्ला राजकीय सुडबुद्धीने केल्याची चर्चा सध्या शिवसैनिकांमध्ये सुरू आहे. (mumbai two shiv sena workers attacked by sword in byculla)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर आणि उपविभाग प्रमुख विजय कामतेकर गुरूवारी रात्री स्वीफ्ट कारमधून घरी निघाले होते. त्यावेळी माझगाव येथे दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी कामतेकर यांच्या कारवर तलवारीने हल्ला केला. त्यावेळी तिन्ही हल्लेखोरांनी मास्क घातला होता. परंतु, गाडीच्या चालकाने प्रसंगावधान दाखवले. त्यामुळे कामतेकर व गावकर हे हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

- Advertisement -

दरम्यान, या हल्ल्याची माहिती मिळताच विभागातील शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शिवसैनिकांनी थेट भायखळा पोलीस ठाण्यात संबंधित घटनेची तक्रार दाखल केली. भायखळा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. हल्लेखोरांचा हेतू शिवसैनिकांना इजा पोहोचवण्याचा होता की केवळ घाबरवण्याचा हे अद्याप समजू शकलेले नाही.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी पक्षाच्या विरोधात बंड केल्यानंतर शिवसैनिकांनी ठिकठिकाणी या आमदारांचे पोस्टर फाडले. त्यांच्यावर टीका केली होती. या सगळ्याचा कालच्या घटनेशी काही संबंध आहे का? की या हल्ल्यामागे काही वैयक्तिक कारणे आहेत, याचाही तपास केला जात आहे.

- Advertisement -

मात्र, या घटनेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून हल्ला झालेल्या शिवसैनिकांना पोलीस संरक्षण दिले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


हेही वाचा – ‘ते’ तीन निर्णय फिरवले असतील तर, हे सरकार हिंदुत्वद्रोही; संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -