घरमुंबईके.जे. सौमय्या व ठाकूर कॉलेज ठरले सर्वोत्कृष्ट

के.जे. सौमय्या व ठाकूर कॉलेज ठरले सर्वोत्कृष्ट

Subscribe

मुंबई विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कॉलेज, आदर्श प्राचार्य, शिक्षक -शिक्षिका पुरस्कार जाहीर केले. हे पुरस्कार ग्रामीण आणि शहरी विभाग अशा दोन वर्गवारीतून देण्यात आले आहेत. यावर्षी सायनमधील के.जे. सौमय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरींग आणि कांदिवलीतील ठाकूर कॉलेजने उत्कृष्ट कॉलेजचा पुरस्कार पटकावला.

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठीचा उत्कृष्ट कॉलेज पुरस्कार ग्रामीण भागातून भिवंडीतील बी. एन. एन. कॉलेज, अलिबागमधील वीर वजेकर कॉलेज फुंडे आणि जे. एस. एम. कॉलेज यांना जाहीर झाला आहे. तर, शहरी भागातून सायनमधील के. जे. सोमैया इन्स्टिटूयट ऑफ इंजिनिअरींग अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि कांदिवलीतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्स यांना उत्कृष्ट कॉलेजच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यावर्षीपासून विद्यापीठाने नव्याने सुरुवात केलेल्या आदर्श प्राचार्य पुरस्कारही यावेळी जाहीर करण्यात आले. त्यामध्ये ग्रामीण भागातून पनवेलमधील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कॉलेजमधील डॉ. गणेश ठाकूर आणि मालाडच्या डी.टी.एस कॉलेजमधील डॉ. मुरलीधर कुर्‍हाडे यांना आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजच्या डॉ. मनिषा भिंगारदिवे यांना प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार ग्रामीण भागातून वसईतील विद्यावर्धिनी कॉलेजचे प्रा. राहूल जाधव, मुंबई विद्यापीठाच्या जैव भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. प्रभाकर डोंगरे, ठाण्यामधील बी. एन. बांदोडकर विज्ञान कॉलेजच्या डॉ. अनिता गोस्वामी-गिरी यांचा सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने शहरी विभागासाठी भांडूपमधील डिएव्ही कॉलेजमधील ग्रंथालय परिचर नंदकिशोर पाटील, विलेपार्ल्यातील मिठीबाई कॉलेजचे प्रयोगशाळा सहाय्यक समीर मेहता, तसेच ग्रामीण विभागातून वैभववाडीतील रावराणे कॉलेजचे अधीक्षक संजय रावराणे, पनवेलमधील विसपूते शिक्षण कॉलेजच्या मुख्य लिपिक परिमला कारंजकर यांचा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ डॉ. विनोद पाटील आणि वित्त व लेखा अधिकारी माधवी इंगोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, धनादेश व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषण कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ डॉ. विनोद पाटील यांनी केले.

पीएचडीच्या विद्यार्थ्यांनाही पुरस्कार
लघुसंशोधन प्रकल्पासाठी वाशीतील फादर कांसीकाओ रॉड्रीक्स तंत्रज्ञान संस्थेच्या कविता शेळके, श्रेयस लाभसेटवार, संजना प्रधान, सोमैया हरिदास या विद्यार्थ्यांना पारितोषिक बहाल करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -