घरमुंबईविद्यापीठाचा बी. कॉम. सत्र ५ चा निकाल जाहीर

विद्यापीठाचा बी. कॉम. सत्र ५ चा निकाल जाहीर

Subscribe

मुंबई विद्यापीठाने ऑक्टोबर २०१९ मध्ये घेतलेल्या टी.वाय.बी.कॉमच्या सत्र ५ चा निकाल जाहीर केला आहे.

मुंबई विद्यापीठाने ऑक्टोबर २०१९ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बी.कॉम सत्र ५ चा ७५:२५ (सी.बी.एस.जी.एस) या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तृतीय वर्ष बी.कॉम या परीक्षेसाठी ३ हजार ११९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर २ हजार ५१९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील (F) ग्रेड मध्ये १ हजार ४५५ विद्यार्थी, E ग्रेड मध्ये २६९ विद्यार्थी, D ग्रेड मध्ये ४७२ विद्यार्थी, C ग्रेड मध्ये २३० विद्यार्थी, B ग्रेड मध्ये ३१ विद्यार्थी आणि A ग्रेड मध्ये १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी ४०.८१% एवढी आहे.

या संकेतस्थळावर पहा निकाल

हे निकाल अचूक लावण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. कोणताही विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव राखीव राहू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. परीक्षा संचालक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शखाली परीक्षा विभाग आणि संगणक विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी अचूक नियोजन केले आहे. निकाल कालबद्धतेत जाहीर होण्यासाठी अथक परिश्रम घेतले असून सदरचा निकाल विद्यापीठाच्या संकेत स्थळावर www.mu.ac.in प्रकाशित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकन हवे असल्यास विहित (नमूद केलेल्या) कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाणेकरांना आढळला बिबट्याचा बछडा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -