घरमुंबईपूरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात

पूरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात

Subscribe

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबई विद्यापीठाने मदतीचा हात पुढे केला आहे.

राज्यातील कोकण, कोल्हापूर आणि सांगली येथे उद्भवलेल्या भीषण पूरपरिस्थिमुळे झालेले नुकसान आणि जनजीवन पूर्वरत होण्यासाठी विविध स्तरातून मदत केली जात आहे. शासकी, पातळीपासून बॉलिवूडमधील कलाकार, खेळाडूंनी स्वतः मदत करत येथील जनतेच्या मदतीसाठी इतरांना आवाहन केले आहे. येथील नागरिकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुंबई विद्यापीठानेसुद्धा मदतीचा हात पुढे करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करणार आहे. त्याचबरोबर या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ पुढे सरसावले आहे. आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत ठराव करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘लालबागचा राजा’ मंडळाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणार

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशावेळी सामाजिक सलोखा आणि बांधिलकी जपत विद्यापीठाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’त २५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर या पूरपरिस्थितीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विद्यापीठाने या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वह्या, पेन, प्रयोगशाळा साहित्य आदी बाबी उपलब्ध करुन देण्यासाठीही पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘केंद्राच्या मदतीची प्रतिक्षा न करता राज्य सरकारने मदतीचा ओघ वाढवावा’

मदतीसाठी अभ्यासगटाची निर्मिती

यासाठी विद्यापीठाने एका अभ्यासगटाची निर्मिती केली आहे. या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत, रविकांत सांगुर्डे, डॉ. सुनिल पाटील, संचालक विद्यार्थी विकास विभाग, डॉ. सुधीर पुराणिक, संचालक राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. मोहन अमरूळे संचालक क्रीडा व शारिरीक शिक्षण यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभ्यासगटाने प्रत्यक्ष ठिकाणी भेटी देऊन व परिस्थितीचा अभ्यास करुन आवश्यक त्या ठिकाणी कोणत्या शैक्षणिक साहित्यांची गरज आहे याचीही पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयांना देखील विद्यापीठाच्या केंद्रीय मदत कक्षामध्ये आवश्यक शैक्षणिक साहित्य जमा करण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येणार असून त्यानुसार विद्यापीठाच्या केंद्रीय मदत कक्षाच्या माध्यमातून मदत केली जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -