Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Mumbai Unlock : मुंबईत बेस्ट बस सोमवारपासून पूर्ण आसनक्षमतेने धावणार

Mumbai Unlock : मुंबईत बेस्ट बस सोमवारपासून पूर्ण आसनक्षमतेने धावणार

प्रवाशांसाठी 'या' असतील अटी

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याने राज्य सरकारने मुंबईसह अनेक शहारांमधील निर्बंध ब्रेकिंग द चेन अंतर्गत शिथिल केले आहेत. यात मुंबईकरांसाठी राज्य सरकारने काही प्रमाणात दिलासाजनक बातमी दिली आहे. लोकलनंतर मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन असलेली बेस्ट बसमधून आता पूर्ण आसनक्षमतेनुसार वाहतूक करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर आता सोमवारपासून (७ जून २०२१) बेस्ट बसेस पूर्ण प्रवासी वाहतूक करु शकणार आहे. त्यामुळे दररोज बेस्ट बसने प्रवास वैतागलेल्या मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहेत.

तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाकडून अधिकाधिक बसगाड्या चालविल्या जाणार आहेत. राज्य सरकारने बेस्टला परवानगी देताना करोना संसर्गाच्या अनुषंगाने काही बंधने घातली आहेत. बेस्ट उपक्रमाच्या बसेसमध्ये मुंबईकर प्रवाशांनी प्रवास करताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर असे लावावा अशी विनंती बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे.


गुगल, फेसबुकसारख्या टेक्नोलॉजी कंपन्यांकडून होणार १५ टक्के टॅक्स वसुली, G-7 देशांमध्ये झाला ऐतिहासिक करार

- Advertisement -

 

- Advertisement -