महिला अत्याचारात मुंबईची दिल्लीकडे वाटचाल, ८ महिन्यात ६१९ बलात्कार तर ७२३ अपहरण

Maharashtra Assembly Winter Session 2021 shakti bill passed in legislative Assembly Session for women safety
Maharashtra Assembly Winter Session 2021: शक्ती विधेयक विधान परिषदेत एकमताने मंजूर

अंधेरीतील साकीनाका येथील बलात्कार व हत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच डोंबिवली येथे एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रच नाही तर अवघा देश पुन्हा एकदा सुन्न झाला असून मुंबई महिला अत्याचारात देशात अव्वल असलेल्या दिल्लीच्या पंगतीत जाऊन बसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, एनसीआरबीने गेल्या वर्षी जारी केलेल्या अहवालातही मुंबईत आठ महिन्यांमध्ये ६१९ बलात्काराच्या घटना घडल्याची नोंद आहे.

यामुळे कधीकाळी महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हणून ओळख असलेली मुंबई आता महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित झाली आहे. गेल्या काही महिन्यात विशेष करुन कोरोना व लॉकडाऊनच्या काळातच देशातील इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईत महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे. गेल्या आठ महिन्यात मुंबईत बलात्काराच्या ६१९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर ७२३ अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. विनयभंगाचे १ हजार २६९ गुन्हे घडलेले आहेत. एनसीबीआरने देशातील १९ महानगरमधील गुन्ह्यांचा आढावा घेतला होता. त्यात महिला अत्याचारात दिल्ली पहील्या क्रमांकावर असून वर्षभरात दिल्लीत ९ हजार ७८२ गुन्हे घडले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली असून ४ हजार ५८३ गुन्हे या काळात घडल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे यातील सर्वाधिक गुन्हे निर्जनस्थळी घडले आहेत. तर काही घटनांमध्ये ओळखीतील व्यक्तींकडूनच महिलांवर अत्याचार करण्यात आले आहेत. यामुळे आता असा निर्जनस्थळांवर पोलिसांचा वॉच असणार आहे.

तर प्रामुख्याने मुंबईतील मालाड लिंक रोड, सबवे, सबवे, स्कायवॉक, झोपडपट्टी परिसरातील अरुंद गल्ल्या या ठिकाणी गुन्हे घडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अशा ठिकाणी पोलिसांचे पेट्रोलिंग असणार आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात निर्भया पथकही तैनात केली जाणार आहेत.