घरCORONA UPDATECoronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १,३९५ नवे रुग्ण; आज ७९ मृत्यू

Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १,३९५ नवे रुग्ण; आज ७९ मृत्यू

Subscribe

मुंबईमध्ये आज १ हजार ३९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आता ५८ हजार १३५ इतकी कोरोनाबाधितांची एकूण संख्या झाली आहे. यामध्ये २८ हजार ९५९ इतके अॅक्टीव्ह केसेस असून आतापर्यंत मुंबईत २६ हजार ९८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकूण २ हजार १९० जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे. तर राज्यातही आज ३ हजार ३९० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून १२० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ हजार ६३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण १ लाख ०७ हजार ९५८ इतकी झाली आहे.

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. रविवारी मुंबईमध्ये ७९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ५९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ५५ पुरुष तर २४ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ४ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ४२ जण हे ६० वर्षांवरील, तर ३३ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचे ७५८ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ४१ हजार ५३४ वर पोहोचली आहे. तसेच १ हजार ०३९ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल २६ हजार ९८६ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. तर बरे ज़ालेल्या रुग्णाचा दर ४६ टक्के असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा –

देवळाली गाव हल्लाप्रकरण : पोलीस अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -