घरमुंबईMumbai Weather alert : शहर, उपनगरांमध्ये सौम्य, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार...

Mumbai Weather alert : शहर, उपनगरांमध्ये सौम्य, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Subscribe

शहर व उपनगरांमध्ये सौम्य, मध्यम व काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

राज्यात मागील काही दिवसांपासून तूरळक पावसाच्या सरी बरसत आहे. तसेच आज हवामान विभागाने अंदाज वर्तवल्या प्रमाणे शहर व उपनगरांमध्ये सौम्य, मध्यम व काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.  हवामान विभागाने समुद्राला येणाऱ्या भरती आणि ओहोटीच्या वेळीची माहिती देत ट्विट केले आहे की, आज ११:२२ वाजेच्या सुमारास ४.०५ मिंटानी भरती येणार आहे. तेसच रात्री २३:०१ सुमारा ३.४६ मिंटानी भरती येणार असल्याचे सांगितले आहे. तर ओहोटी १७:१९ वाजता २.०९ मी येण्याची शक्यता आहे. इतकचं नाही तर गेल्या २४ तासात सरासरी पावसाची नोंद देखील करण्यात आली आहे. याप्रमाने शहरात येत्या 24 तासात ७.३७ मिमी पावसाच्या सरी बरसणार आहे. तसेच पूर्व उपनगरात २०.८६ मिमी,पश्चिम उपनगरात ४.२३ मिमी पाऊस पडणार आहे.

- Advertisement -

भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करुन मुंबईत तसेच ठाण्यात आज सकाळपासूनच 8:30 वाजता येत्या 24 तासात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्याता आहे.आयएमडीने दर्शविल्याप्रमाणे पुढील २,३ तासांमध्ये पावसाच्या अंदाजासह मुंबईत ढगाळ वातावरण राहणार आहे.

- Advertisement -



हे हि वाचा – Petrol Diesel Price: इंधनदरवाढीचा भडका कायम! आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -