घरताज्या घडामोडीमुंबईकरांनो सावधान, दुपारी २ वाजता हाय टाईड!

मुंबईकरांनो सावधान, दुपारी २ वाजता हाय टाईड!

Subscribe

मुंबईत किनारपट्टीच्या भागांजवळ राहणाऱ्या लोकांना बाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबईत पुन्हा एकदा  ढगाळ वातावरण तयार झाले आहे. शहरातील बर्‍याच भागात पाऊस सुरू झाला आहे. दरम्यान,  हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास मुंबईत हायटाईडची घोषणा केली आहे. त्या दरम्यान समुद्राच्या लाटा ४.६६ मीटर पर्यंत वाढू शकतात. धोका लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने लोकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबईत किनारपट्टीच्या भागांजवळ राहणाऱ्या लोकांना समुद्रात भरती शक्यता असल्याने बाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांचे पथक संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून आहे. मुंबईती सकाळपासून बर्‍याच भागात पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी साचायला सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार केवळ मुंबई नाही तर दिल्ली आणि आसपासच्या काही भागात गुरुवारी मध्यम पाऊस आणि काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राजधानी दिल्ली, ओडिशा, छत्तीसगड, गंगा पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


हे ही वाचा – Instagram वर दीपिका- प्रियांकाचे फेक फॉलोअर्स, पोलीस करणार चौकशी!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -