घरCORONA UPDATEमुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ ते ३५०० होणार - पालिका आयुक्त

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ ते ३५०० होणार – पालिका आयुक्त

Subscribe

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाशी मुंबई महानगर पालिका देखील धीराने लढा देत आहे. देशातला पहिला कोरोनाचा रुग्ण मुंबईतूनच पुण्याला गेला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ८००च्या वर गेली आहे. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. राज्याच्या अनेक भागांमधून मुंबईत कोरोनाचे रुग्ण उपचारांसाठी दाखल झाल आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या काळात काय चित्र दिसणार? असा प्रश्न प्रत्येक मुंबईकराला पडला आहे. त्यावर आता मुंबईचे पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनीच सविस्तर उत्तर दिलं आहे. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधित असेल आणि ती ३ ते ३.५ हजारांच्या घरात असेल, असे सूतोवाच प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनाचा फैलाव होत असलेल्या भागामध्ये एक कोणतातरी कालावधी असतो, ज्या काळात तिथल्या कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक संख्येत वाढतात. मुंबईसाठी हा काळ येत्या ३ ते ४ दिवसांमध्येच येणार असल्याचं परदेशी म्हणाले आहेत. पण रुग्णसंख्या जरी वाढली, तरी परिस्थिती मात्र हाताबाहेर जाणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. ‘हा माझा अंदाज आहे की आपल्याकडे प्रत्येक १० लाख लोकसंख्येमागे ३०० रुग्ण आढळले आहेत. जागतिक स्तरावर हीच सरासरी १०० ते १५० रुग्णांची आहे. पण फ्रान्स आणि इटलीसारख्या देशांमध्ये हीच सरासरी तब्बल १२०० रुग्ण प्रति १० लाख अशी आहे’, असं परदेशी म्हणाले.

- Advertisement -

…म्हणून मुंबईत जास्त रुग्णसंख्या!

दरम्यान, यावेळी आयुक्तांनी मुंबईत जास्त रुग्ण आढळण्याचं कारण देखील सांगितलं. ‘आपण जितक्या जास्त चाचणी करू, तितकी रुग्णसंख्या जास्त वाढते. आपण आत्तापर्यंत मुंबईत १२ हजार चाचण्या केल्या आहेत आणि त्यातून ८८४ रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिल्लीने ५ हजार ५०० चाचण्या केल्या आहेत आणि त्यांच्याकडे १९२ रुग्ण आढळले आहेत. आत्ता मुंबईत १० हजार लोकं क्वॉरंटाईन आहेत’, असं ते म्हणाले. हा आकडा तिप्पट वाढण्याची देखील शक्यता परदेशींनी व्यक्त केली.

पीपीईची कमतरता नाही

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक पालिका अधिकाऱ्यांनी पीपीई किटची कमतरता असल्याची तक्रार केली होती. मात्र, यावर
बोलताना परदेशी म्हणाले, ‘सुरुवातीला आमच्याकडे पीपीई कमतरता होती. पण आता जिंदाल आणि रिलायन्स या उद्योग समूहांनी पीपीई किटचं उत्पादन सुरू केलं आहे. आठवड्याला १ लाख पीपीई किटच्या उत्पादनाचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे. सध्या आमच्याकडे २० हजार पीपीई किट असून आम्ही जिथे आवश्यक आहेत, तिथेच त्यांचा वापर करत आहोत’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -