विनयभंगाचा खोटा आरोप, न्यायालयाने ठोठावला २५ लाखांचा दंड

विनयभंग सारख्या गंभीर गुन्ह्याचा खोटा आरोप केल्यामुळे एका महिलेला न्यायालयाने दंड ठोठावला आहे. यातील काही पैसे टाटा मेमोरियल ट्रस्टला देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

bombay high court
मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

महिलांवर अत्याचाराचे प्रमाण कमी होण्याासाठी अत्याचार करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा केली जाते. महिलांच्या सरक्षणासाठी कायद्यातही वेळेनुसार बदल करण्यात आलेत. मात्र या कायदा काही महिला दुरुपयोग होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर न्यायालयाने संबधित महिला आणि तिच्या पतीला २५ लाखांचा दंड ठोठावला आहे. विनयभंगा सारख्या गंभीर गुन्ह्याची फिर्याद या महिलेनी केली होती. मात्र स्वतःच्या फायद्यासाठी हा आरोप केल्याचे समोर आल्यानंतर न्यायालयाने या दाम्पत्याला दंड ठोठावला. या दंडातील १० लाख रुपये टाटा मेमोरियल ट्रस्टमधील कर्करोग रुग्णांना देण्यात यावा असे आदेश देण्यात आला. नेहा गणधीर आणि तिचे पती पुनित गणधीर यांना न्यायालयाने दंडित केले आहे. २५ लाखाची रक्कम फेब्रुवारीअखेरपर्यंत तीन हफ्त्यात जमा करावी असे न्यायालयाने सांगितले.

काय आहे प्रकरण

नेहा गणधीर ही खोकल्यावरील औषण बनविणाऱ्या फील गूड या कंपनीच्या मालक आहेत. तिचा कारखाना हरियाणाच्या पानिपत जिह्यात हुडा येथे आहे. त्यांच्या औषधांची विक्री मुंबईतील वरळी येथील नरेंद्र मार्केटिंग या कंपनीद्वारे केली जाते. मात्र या औषधावर मे. सपट अॅण्ड कंपनी (बॉम्बे) प्रा. लि. या कंपनीने कॉपीराइट्सचा आरोप  केला होता. गणधीर दाम्पत्याने आपल्या कंपनीचे लेबल या बाटल्या बाजारात विकल्या असल्याचा दावा करण्यात आला होता. हा खटला न्यायालयात सुरु करण्यात आला.

विनयभंगाची खोट्या तक्रारीची धमकी

या खटल्याचे न्यायाधिश काथावाला यांनी डिसेंबर महिन्यामध्ये एका निरिक्षकाला नेमले. पोलिसांच्या मदतीने गणधीर यांच्या कारखान्यात असलेल्या औषधांच्या बाटल्यांचे निरिक्षण करण्यासाठी हा निरिक्षक गेला होता. हरियाणातील कंपनीमध्ये हे पथक निरिक्षणासाठी गेले असता मनुष्यबळाचा वापर करुन त्यांना थांबवण्यात आले. तसेच कोर्टाचे अधिकारी गुमान निघून गेले नाहीत तर विनयभंगाची खोटी तक्रार करून त्यांना अडकवण्याची धमकी देण्यात आली होती. या निरिक्षकाने कोर्टात अहवाल सादर केल्यानंतर चूक झाल्याचे कबूल करण्यात आले. रागात ही धमकी दिली असल्याचे नेहाने सांगितले. गणधीर दाम्पत्याने सध्या न्यायालयासमोर दिलगीरी व्यक्त केली आहे तसेच पैसे भरण्याचीही तयारी दाखवली आहे.