धक्कादायक! मित्रांच्या मदतीने पतीने घडवला पत्नीवर बलात्कार

मित्रांच्या मदतीने पतीने आपल्या पत्नीवर बलात्कार घडवल्याची धक्कादायक घटना जोगेश्वरी येथे घडली आहे. याप्रकरणी पतीसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मित्रांच्या मदतीने पतीने आपल्या पत्नीवर बलात्कार घडवल्याची धक्कादायक घटना जोगेश्वरी येथे घडली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या दोन मित्रांच्या मदतीने पत्नीवर बलात्कार घडवून आणणाऱ्या पतीला दोन आरोपींसह जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली आहे.

नेमके काय घडले?

फेसबुकवर ओळख झालेला मुख्य आरोपी रिक्षा चालक असून तो पालघर जिल्ह्यामध्ये राहत आहे. या आरोपीची फेसबुकवरुन दोन तरुणांसोबत मैत्री झाली होती आणि तो त्यांना भेटण्यासाठी जोगेश्वरी याठिकाणी आपल्या पत्नीला चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने घेऊन आला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला जोगेश्वरीत एका झोपडीत घेऊन गेला. तिथे त्याचे दोन मित्र आधीपासूनच त्याठिकाणी उपस्थित होते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ज्या झोपडीत पती घेऊन गेला होता. त्यावेळी त्याचे मित्र देखील त्याठिकाणी उपस्थित होते. त्या मित्रांना या महिलेच्या पतीने बलात्कार करायला सांगितला. नंतर स्वत: त्याने लैंगिक जबरदस्ती केली. या प्रकारानंतर पत्नी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली. मात्र, ही घटना जोगेश्वरी याठिकाणी घडल्यामुळे पालघर पोलिसांनी हे प्रकरण जोगेश्वरी पोलिसांकडे ट्रान्सफर केले. हा संपूर्ण प्रकार मागच्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात घडल्याचे समोर आले आहे. पत्नीने जानेवारी महिन्यात तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे अर्ज दाखल केला असून सामूहिक बलात्कार आरोपाखाली तिन्ही आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


हेही वाचा – मुंबईत करोनाचा आणखी एक संशयित, रुग्णांची संख्या ४