घरमुंबईदेशातील सर्वात महागडी घरं मुंबईच्या वरळीत; 'या' व्यावसायिकानं खरेदी केलं 240 कोटींचं घर

देशातील सर्वात महागडी घरं मुंबईच्या वरळीत; ‘या’ व्यावसायिकानं खरेदी केलं 240 कोटींचं घर

Subscribe

देशाची आर्थिक राजधानी मुंबईला स्वप्नांच शहर म्हणून ओळखलं जातं. या मुंबईत आपल्या हक्काचं, स्वत:चं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. मुंबईतील 60 टक्के नोकरदार घरं घेण्याच्या स्वप्नामागे धावत असतो. यातील काहींचं स्वप्न लवकरं पूर्ण होतं तर काहींना त्यासाठी प्रतिक्षा करावी लागते नाही तर त्या स्वप्नावर पाणी सोडावं लागतं. यामागचं कारण म्हणजे मुंबईत दिवसेंदिवस गगणाला भिडणाऱ्या घरांच्या किंमती. या किंमतींच गणित सर्वांनाच जुळवून घेणं जमत नाही. मात्र मुंबईत सध्या एका घराचा व्यवहार मोठ्या चर्चेचा विषय झाला आहे. केवळ मुंबईच नाही तर जगभरात या घराची चर्चा होतेय. इतकचं नाही तर भारतातील आतापर्यंतचं सर्वात महाग विक्रीस गेलेलं घर म्हणून देखील याची चर्चा आहे. यावरून देशातील सर्वात महागडी घरं ही मुंबईतील वरळीत विक्रीस जात असल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबईतील मोक्याचं ठिकाणं असलेल्या वरळीत एका व्यावसायिकाने तब्बल 240 कोटी रुपयांना अलीकडचे एक पेंटहाऊस खरेदी केलं. बी.के. गोएंका असं या व्यावसायिकाचं नाव असून ते Welspun Group चे अध्यक्ष आहेत.

- Advertisement -

वरळीत गेल्या काही वर्षांपासून अनेक मोठे बिल्डिंग प्रोजेक्ट आल्याने तेथील वस्त्यांचा कायापालट होत आहे. चाळी तोडून तिथे मोठ्या इमारती बांधल्या जात आहेत. वरळीतील अशाच एका नावाजलेल्या प्रोजेक्टमध्ये गोएंका यांनी घरं खरेदी केलं आहे. वरळीतील Three Sixty West या अॅनी बेझंट मार्गावरील प्रोजेक्टमध्ये त्यांनी घर खरेदी केलं आहे. हे घरं थ्रीफ्लेकस असून 63, 64, 65 अशा तीन मजल्यांपर्यंत विस्तृत आहे. B टॉवरमझधील या घराचं क्षेत्रफळ तब्बल 30,000 चौरस फूट इतकं आहे.

सर्वसामान्यांच्या घराच्या 100 पटीने मोठं घर

गोएंका यांनी वरळीत खरेदी केलेल्या घराचं क्षेत्रफळ मुंबईतील पुनर्वसनाच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या किमान 300 चौरस फुट घरापेक्षा तब्बल 100 पटींनी मोठं आहे. दरम्यान गोएंका या घरी वास्तव्यासाठी येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पुढील दोन महिन्यात घरांचे असे डोळे चक्रवणारे व्यवहार पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

दरम्यान प्रोजेक्टमधील दुसऱ्या विंगमधील पेंटहाऊस खुद्द बिल्डर विकस ओबेरॉय यांनी खरेदी केलं असून त्याची किंमत 240 कोटी रुपये आहे. ओबेरॉय यांचाच हा प्रोजेक्ट आहेय यामध्ये व्यावसायिक आणि बिल्डर सुधाकर शेट्टी यांनीही भागीदारी केली आहे. ओबेरॉय यांच्याकडून हे घरं त्यांच्या R S Estates Pvt Ltd या कंपनीच्या नावे खरेदी करण्यात आलं आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच; ‘या’ तारखेला पुढील सुनावणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -