घरमुंबई१५.४ टक्के मुंबईकर उच्च रक्तदाबाबाबत अज्ञात

१५.४ टक्के मुंबईकर उच्च रक्तदाबाबाबत अज्ञात

Subscribe

भारतीयांमध्ये हृदयाचे ठोके हे दर मिनिटाला साधारणपणे ८० प्रति मिनिट इतके पडत असल्याचेही यातून समोर आलं आहे

शरीराला एखादा मोठा आजार जडला मगच आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. त्यातून मध्येच हृदयविकाराचा विकार जडल्याचं निष्पन्न होतं. पण, अधिकाधिक लोकांना त्यांना असलेल्या हृदयाच्या विकाराबाबत माहितीच नसते. जवळपास १५.४ टक्के मुंबईकर उच्च रक्तदाबाबाबत अज्ञात असल्याचं एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. भारतीय नागरिक रक्तदाब आणि मधुमेह तपासणीसाठी प्रथम क्लिनिकमध्ये जातो, त्यावेळी उच्च रक्तदाब असल्याची जाणीवच नसलेल्या आणि व्हाईट-कोट उच्च रक्तदाब यांचे प्रमाण ४२ टक्के इतके असते, असा निष्कर्ष इंडिया हार्ट स्टडी (आय.एच.एस.) च्या एका अभ्यासात आढळला आहे. तसंच, हृदयाचे ठोके सामान्यतः ७२ प्रति मिनिट इतके असणे अपेक्षित असताना, भारतीयांमध्ये हृदयाचे ठोके हे दर मिनिटाला साधारणपणे ८० प्रति मिनिट इतके पडत असल्याचेही यातून समोर आलं आहे.

उच्च रक्तदाबाविषयी चुकीच्या निदानाचा धोका

मुंबईतील तब्बल १ हजार ६४३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यातील १५.४ टक्के जणांना स्वतःला उच्च रक्तदाब असल्याची जाणीवच नसल्याचे (मास्कड हायपरटेन्शन) दिसून आले, तर २२.८ टक्के जणांना व्हाईट-कोट हायपरटेन्शन असल्याचे आणि त्यामुळे त्यांचे ते निदान चुकीचे ठरत असल्याचे आढळून आले. हा अभ्यास घेण्यात आलेल्या इतर ठिकाणांच्या तुलनेत ५० टक्के सहभागासह, अधिक स्त्रिया आरोग्याबद्दल जागरूक असल्याचे दिसून आले. बत्रा हॉस्पिटल अॅन्ड मेडिकल रिसर्च सेंटर या संस्थेने एरिस लाइफ सायन्सेसने इंडिया हार्ट स्टडी हे सर्वेक्षण केले होते. रक्तदाबाच्या तपासण्या या औषधांची अजिबात सवय नसलेल्यांचे हे सर्वेक्षण होते. भारतातील एकूण १५ राज्यांमध्ये नऊ महिन्यांच्या कालावधीत १ हजार २३३ डॉक्टरांनी १८ हजार ९१८ पुरुष आणि महिलांची रक्तदाब तपासणी केली. या तपासण्यांमध्ये सहभागी झालेल्यांच्या रक्तदाबाचे त्यांच्या घरीच दिवसातून चार वेळा असे सलग ७ दिवस निरीक्षण करण्यात आले होते. यात ४२ टक्के भारतीयांना उच्च रक्तदाबाविषयी चुकीच्या निदानाचा धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

- Advertisement -

उच्च रक्तदाबाचे अस्तित्व शोधणे कठीण

अनियंत्रित उच्च रक्तदाब, म्हणजे हायपरटेन्शन, हे हृदयविकाराचा झटका वाढण्याचे देशातील सर्वात सामान्य कारण आहे. ही लक्षणे लवकर दिसून येत नसल्यामुळे, उच्च रक्तदाबाचे अस्तित्व शोधणे कठीण आहे. हृदयाचे जास्त ठोके पडणे यातून आरोग्याची गुंतागुंत वाढत जाते, असं हिंदुजा हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्टचे समन्वयक डॉ. पोंडे यांनी सांगितलं. उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडांसह शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम होतो. अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाचा तीव्र आजार होऊ शकतो, असं नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत राजपूत यांनी सांगितले.

भारतात उच्च रक्तदाबाच्या क्लिनिकल व्यवस्थापनाची मोठी आवश्यकता असल्याचे इंडिया हार्ट स्टडीचा अहवाल दर्शवितो. हा अभ्यास खास भारतीयांसाठी करण्यात आला असून भारतीयांमधील उच्च रक्तदाबाचे निदान करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती बनविण्यास तो मदत करील. या अभ्यासामध्ये उच्च रक्तदाबाच्या विविध पैलूंचा विस्तृत डेटा सादर करण्यात आला आहे.
डॉ. कौल, हृदयरोग तज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -