Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई 'मुंबई आमची-सामान्य माणसांची'! मुंबईतील सामान्य माणसांसाठी मुंबईकरांचं अभियान

‘मुंबई आमची-सामान्य माणसांची’! मुंबईतील सामान्य माणसांसाठी मुंबईकरांचं अभियान

Related Story

- Advertisement -

मुंबई हे एक असे शहर आहे ज्या शहराला झोप येत नाही. जागेपणी स्वप्न बघणारी एकीकडे चकमक तर दुसरीकडे भयाण अंधार. मुंबई ही मायानगरी आज ६० वर्षाची झाली, हिला नेमकं चालवतं तरी कोण? उत्तर आहे मुंबईकर, हा मुंबईकर बंगला, बी.डी.डी चाळ, बिल्डिंग, झोपडपट्टीत राहणारा पण यांना लागणाऱ्या सुविधा कोण पुरवतं? तर महानगरपालिका.

सर्वात मोठं बजेट असलेली मुंबई महानगरपालिका जीची स्थापना १८८८ साली झाली. मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख, २२७ नगरसेवक, २४ प्रशासकीय वॉर्ड, ज्याचं बजेट ४० हजार करोड आहे. पण वास्तव मात्र वेगळं आहे, कारण मुंबईकरांची आजही सर्व बाबतीत यातायात होत आहे आणि ती होऊ नये म्हणून मुंबईतील मुंबईकर एकत्र येत आहोत हा बदल घडवण्यासाठी.

- Advertisement -

१ मे रोजी मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाच्या भूमिकेचे पोस्टर सोशल मीडिया च्या माध्यमातून प्रकाशित करत आहोत.

मुंबई आमची – सामान्य माणसांची भूमिका…

मुंबई हे सर्वांच्याच आशा–अपेक्षा आणि स्वप्नांचे शहर. मुंबईकरांच्या कष्टाने-श्रमाने मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर बनलं, जागतिक बाजारपेठ बनलं. या स्वप्न नगरीमध्ये विषमतेची दरी वाढत आहे. ७० ते ८० टक्के लोकांचं राहणीमान निकृष्ट दर्जाचे होत आहे. या स्वप्न नगरी मुंबईची अशी भकास अवस्था का?

- Advertisement -

मुंबई जितकी श्रीमंत – उच्चभ्रूंची आहे, तितकीच सामान्य माणसांची आहे. पण येथील श्रीमंत – उच्चभ्रूना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, सामान्य कष्टकऱ्यांना, लोकल ट्रेन – बसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मिळतात का? रस्त्यावर, फुटपाथवर व्यवसाय करणारे लाखो छोटे व्यापारी, झोपडपट्टी, SRA मध्ये राहणारे, घरकाम करणारे, अनेक असंघटीत मजुरांना, बालकांना, तृतीयपंथींना, दिव्यांगाना मुलभूत सोयी-सुविधांसाठी त्यांना तडजोड का करावी लागते? खड्डेमुक्त -प्रदूषणमुक्त मुंबई मिळणं हा प्रत्येक मुंबईकरांचा अधिकार आहे.

‘मुंबई आमची – सामान्य माणसांची’ या अभिनयाचे मुख्य ध्येय म्हणजे मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि अधिकारांसाठी जागरूक करून लोकसहभागातून संघर्ष करण्यास प्रवृत्त करणे. त्याचबरोबर मुंबई हि जितकी उच्चभ्रू श्रीमंतांची आहे तितकीच ती सामान्य माणसांची सुद्धा आहे याची जाणीव करून देणे. त्यातून मुंबईचे शासन – प्रशासन सामान्य माणसांसाठी दक्षपणे, सक्षमपणे आणि जबाबदारीने कार्यरत करणे हे ह्या अभियानाचे अंतिम ध्येय आहे.

या अभियानात सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय अभ्यासक वर्षा विद्या विलास, अमोल मडामे, डॉ.प्रभा तीरमरे, अविनाश पाटील, डॉ.वत्सला शुक्ला, दीपक सोनवणे, किरण सोलंकी, सुनील चव्हाण, बिलाल खान, फहाद अहमद, संदेश लाळगे, किरण सोलंकी, खुशबू खान, (विकास) आशा पुजारी, सुशील शिंदे, प्रमोद शिंदे, देवेंद्र ठाकुर, जॉनसंन्स एबंझेर , अगस्तीन बेंजामिन, भानुप्रीया नाडर, प्रवीण दाभाडे, मुबारक शेख, अरिश, चाऊस शेख, वीरेंद्र दिवांर, निनाद पाटील, पंकज दळवी, किरण कदम, रमेश कदम, प्रतीक कांबळे, राजेश मोरे, अमोल निकाळजे, संतोष शिंदे, जमीला शेख, नागेश सुर्वे प्रो.जालंदर अडसुले,योगिनी पगारे असे मुंबईत विविध प्रश्नांवर काम करणारे कार्यकर्ते मुंबईकरांना ह्या अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहोत. मुंबईत हे अभियान २२७ वॉर्डात राबविले जाणार आहे
ज्यात २४ महानगर पालिका च्या गेट वर मोठी पारदर्शक तक्रार पेटी ठेवावी अशी मागणी ही करण्यात येणार आहे.

मुंबईतील सामान्य माणसांसाठी मुंबईकरांचे अभियान

मुंबईतील सामान्य माणसांसाठी मुंबईकरांचे अभियान

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Monday, 3 May 2021

- Advertisement -