मुंबईकरांनो बाहेर पडताय? पण आधी लोकलचे वेळापत्रक पाहा…

आज रविवारी (ता. १९ मार्च) मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीचे काम करण्याकरिता मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या विभागाकडून देण्यात आलेली आहे.

Mumbaikars check the local schedule before going out

रविवार म्हणजे सुट्टीचा वार. यानिमित्ताने अनेक मुंबईकर हे फिरण्यासाठी घराच्या बाहेर पडत असतात. पण त्याआधी आजच्या दिवशी मुंबईकरांनी लोकलचे वेळापत्रक पाहणे फार गरजेचे आहे. कारण आजच्या (ता. १९ मार्च) दिवशी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे कडून प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १० वाजून ५५ मिनिटांपासून ते दुपारी ०३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १० वाजून ४८ मिनिटांनी ते दुपारी ०३ वाजून ४० मिनिटे यावेळेस सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानका दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. तसेच भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शिव आणि कुर्ला स्थानकांवर या गाड्या थांबवण्यात येणार आहेत आणि पुढे पुन्हा योग्य डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आलेली आहे

तर, घाटकोपर येथून सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपासून ते दुपारी ०३ वाजून ५२ मिनिटांपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान कुर्ला, शिव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल मार्गावर आज कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याची माहिती देखील रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. तसेच मध्य रेल्वेवर घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल देखील रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे.


हेही वाचा – पुण्यात खासगी बसला अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने १५ फूट खाली कोसळली बस