घरताज्या घडामोडीमुंबई होतेय Unlock, घराबाहेर पडताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

मुंबई होतेय Unlock, घराबाहेर पडताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Subscribe

मुंबईकरांनो 'या' चुका टाळा.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. परंतु, तरी देखील राज्य सरकारने हे लॉकडाऊन येत्या १५ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, नियमामध्ये शिथिलता आणली आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा अनलॉक होत आहे. परंतु, मुंबई अनलॉक होत असली तरी देखील गाफिल राहू नका, अन्यथा पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ होईल आणि परत लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल. त्यामुळे काही चुका टाळणे फार गरजेचे आहे. त्या कोणत्या चुका टाळाव्यात पाहुया.

  • घराबाहेर पडताना कोरोनाला रोखण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी विसरता कामा नये. त्याचे तंतोतन पालन करा.
  • घराबाहेर पडताना आपल्या भागामध्ये कोणत्या वेळेत काय सुरु आहे हे पाहुन मगच घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या. विनाकारण गर्दी करु नका.
  • सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहे. त्यामुळे गर्दी करणे शक्यतो टाळा.
  • शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार यादी नोंद घ्या.
  • रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्या आणि स्टॉल्सना सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत परवानगी. मात्र, केवळ पार्सल घेऊन जाऊ शकता.
  • अत्यावश्यक वस्तू वगळता इतर सेवा ऑनलाईन उपलब्ध असल्याने घराबाहेर पडू नका. ऑनलाईन शॉपिंगला अधिक प्राधान्य द्या.
  • दुपारी ३ नंतर अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास होणार दंडात्मक कारवाई केली जाणार
  • मद्यपान खरेदीसाठी सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत परवानगी. तसेच घरपोच सुविधाही घेता येणार, त्यामुळे घराबाहेर जाणे टाळा.
  • गर्दीची ठिकाण टाळा अन्यथा पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होईल आणि पुन्हा लॉकडाऊन लागेल.

    हेही वाचा – मुंबई पालिका आयुक्तांचे कोविडबाबत राज्यातील महापालिकांच्या वरिष्ठांना मार्गदर्शन


Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -