घरमुंबईमुंबईकर सर्दी,खोकला आणि तापाने हैराण, वातावरणातील बदलाचा परिणाम

मुंबईकर सर्दी,खोकला आणि तापाने हैराण, वातावरणातील बदलाचा परिणाम

Subscribe

मुंबईमध्ये सकाळच्या वेळी सुखावणारा गारवा असतो, तर दुपारनंतर मात्र अंगाला चटके देणारे ऊन. ज्यामुळे मुंबईकर आता त्रस्त झालेले आहेत. वातावरणात होणाऱ्या या बदलामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू लागल्या आहेत.

मुंबई : मागील आठवड्यापासून राज्यातील परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. मुंबईत देखील परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून मुंबईच्या वातावरणामध्ये यामुळे मोठा बदल जाणवून येऊ लागला आहे. मुंबईमध्ये सकाळच्या वेळी सुखावणारा गारवा असतो, तर दुपारनंतर मात्र अंगाला चटके देणारे ऊन. ज्यामुळे मुंबईकर आता त्रस्त झालेले आहेत. वातावरणात होणाऱ्या या बदलामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू लागल्या आहेत. ऑक्टोबर महिना सुरू झाला असून दिवसभर उन्हाचे चटके आणि पहाटे गारवा या मिश्र वातावरणाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर झालेला आहे. हवेतील या बदलामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांनी मुंबईकर हैराण झालेले पाहायला मिळत आहे. तर अनेकांकडून आरोग्याच्या तक्रारी देखील करण्यात येत आहेत. (Mumbaikars suffer from cold, cough and fever, the result of climate change)

हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार, राज्य सरकार खरंच न्याय देणार का?

- Advertisement -

गेल्या आठवड्याभड्यापासून मुंबईमध्ये परतीच्या पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. ज्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याच्या हिटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबईत दुपारच्या वेळी कडक उन्हाच्या झळा अंगाला बसत असल्याने मुंबईकर हैराण झालेला आहे. तर आता पुढील तीन ते चार दिवसात मुंबईतील कमाल तापमान हे 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 25 सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेली आहे.

तर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सध्या तापमान हे 32 अंशाच्या पुढे गेल्याने आणखी कडक ऊन लागण्यास सुरुवात झालेली आहे. ऑक्टोबर हिटमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये नागरिक त्रस्त असतानाच आता मुंबईकरांना देखील ऑक्टोबर हिटचा तडाखा बसताना पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस मुंबई शहरातील व उपनगरातील नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार असून त्यानंतर तापमानात काही प्रमाणात घट दिसून येईल, अशी माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे. परंतु उद्यापर्यंत (ता. 12 ऑक्टोबर) मुंबईचे तापमान हे कमाल 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -