घरमुंबईवाट पहाते मी गं...(कधी?) येणार 'मोनो' माझी!

वाट पहाते मी गं…(कधी?) येणार ‘मोनो’ माझी!

Subscribe

मुंबईत नोव्हेंबर २०१७ मध्ये मोनोच्या दोन डब्याला आग लागली आणि त्या क्षणापासून मोनो ठप्प झाली. वेळोवेळी नवीन काहीतरी अडचण निर्माण होऊन मोनो पुन्हा सुरू होण्याचा मुहूर्त लांबणीवर पडतोय. त्यामुळे ‘वाट पहाते मी गं…कधी येणार मोनो माझी?’ अशीच मुंबईकरांची प्रवाशांची अवस्था झाली आहे. पण आता मोनोसाठी प्रवाशांना आणखी काही दिवस थांबावं लागणार आहे. कारण मोनो सुरु करण्याआधी त्याच्या सुरक्षेचं काय? असा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबईकरांची प्रतिक्षा संपेना

- Advertisement -

चेंबूर ते जेकब सर्कल असा मोनोरेल प्रकल्प उभारण्यात आला आहे. २०१४ साली येथील कामाला सुरुवात झाली. २०१७च्या मध्यावर चेंबूर ते वडाळा असा मार्ग सुरु करण्यात आला. मोनो रेल सुरु झाल्यापासून मेट्रोच्या तुलनेत मिळणाऱ्या कमी प्रतिसादामुळे मोनो रेल तोट्यात होती. २०१७ साली आग लागल्यानंतर ही सेवा पूर्णत: ठप्प झाली. त्यानंतर मोनो सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी एमएमआरडीएकडून करण्यात आली आहे. मात्र मोनोच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न पब्लिक अकाऊंटस कमिटीने (PAC) उपस्थित केला आहे.

monorail set on fire
मोनो रेलची आग विझवताना अग्निशमनदलाचे अधिकारी

मोनोचा फायदा कुणाला?

- Advertisement -

मोनो प्रकल्प नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. लोकलेखा समिती अर्थात PAC ने या संदर्भातला एक अहवाल सादर केला असून त्यात मोनोच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवाय मोनोचा प्रकल्प पैशांचा अपव्यय असून इतर इतर कोणत्याही प्रवासी सुविधांचा पर्याय मोनोला कनेक्ट नसल्यामुळे या प्रकल्पाचा मुंबईकरांना फारसा फायदा नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मोनोच्या जबाबदारीची टोलवाटोलवी

मोनो ही एमएमआरडीएकडून चालवली जाते. पण मोनोच्या देखभालीचा खर्च एमएमआरडीएला परवडत नसल्यामुळे अनेक खासगी कंपन्यांकडे मोनोची जबाबदारी घेण्यायासाठी प्रस्ताव पाठवण्यात आले. पण नाकापेक्षा मोती जड म्हणत अनेक कंपन्यांनी ही जबाबदारी घेणं टाळलं. त्यानंतर मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनकडे या संदर्भात प्रस्ताव पाठण्यात आला. पण अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा निर्णय होईपर्यंत मोनोची जबाबदारी घेणार कोण? हा प्रश्नच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -