घरक्राइममुंबईच्या BKC तील अमेरिकन कॉन्सुलेटच्या कार्यालयाला धमकीचा फोन

मुंबईच्या BKC तील अमेरिकन कॉन्सुलेटच्या कार्यालयाला धमकीचा फोन

Subscribe

मुंबईतील अमेरिकन कान्सुलेटच्या बीकेसीतील कार्यालयाला धमकीचा फोन आला. अमेरिकन कान्सुलेटचे ऑफिस बॉम्बस्फोट करून उडवून देणाऱ्या धमकीचा फोन मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास या ऑफिसला आला होता. या फोननंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण या फोनमध्ये दिलेल्या धमकीनुसार याठिकाणी काहीही संशयास्पद आढळून आले नाही. पोलिसांनी याठिकाणी तपास केल्यानंतर अखेर हा कॉल खोटा असल्याचे निष्पन्न झाले. याठिकाणी तपास झाल्यानंतर या संपुर्ण प्रकरणावर पडदा पडला. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

अमेरिकेच्या काऊंसलेट जनरल मुंबईची ब्रॅंच ही अमेरिकेच्या डिप्लोमॅटिक मिशनचा एक भाग आहे. नवी दिल्लीतील अमेरिकन दुतावासाचा हा एक भाग आहे. ही कान्सुलेट पश्चिम भारताचे प्रतिनिधीत्व करते. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीगड आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे. भारतातील सर्वात व्यस्त अशा कान्सुलेट पैकी एक अशी मुंबईची कान्सुलेट आहे. अमेरिकन नागरिकांना रहिवासासाठीच्या, प्रवासासाठीच्या सुविधा पुरवणे हे कान्सुलेटचे मुख्य कार्य आहे. तर आपत्कालीन स्थितीत मदत करणे आणि पासपोर्टशी संबंधित मदत करणे हे कान्सुलेटचे काम आहे. तसेच अमेरिकेचे नागरिक नसलेल्या नागरिकांना व्हिझा पुरवण्याचेही काम कान्सुलेटकडून करण्यात येते. अल्प कालावधीच्या दौऱ्यांसाठी तसेच इमिग्रेशनसाठीही कान्सुलेट महत्वाचे काम करते.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -