घरCORONA UPDATEठाणे, पुणे नंतर मुंबईतही लॉकडाऊन? आयुक्तांनी केला सर्वात मोठा खुलासा

ठाणे, पुणे नंतर मुंबईतही लॉकडाऊन? आयुक्तांनी केला सर्वात मोठा खुलासा

Subscribe

मुंबईच्या आजुबाजूला असलेल्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि पिंपरी-पुणे येथे लॉकडाऊन घोषित केल्यानंतर मुंबईत देखील लॉकडाऊन होणार का? अशी चर्चा सुरु होती. कारण मुंबईत रोज राज्यातील सर्वाधिक रुग्णवाढ होत असते. मुंबईतील लॉकडाऊनबाबत महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी खुलासा केला आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईने कोरोनाला रोखण्यात यश मिळवले असून मुबंईतील रुग्णवाढीच्या दुपटीचा कालावधी ५० दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईत पुर्णपणे लॉकडाऊन करण्याची गरज नाही, अशी माहिती इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली येथे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या असली तरी रुग्णवाढिचा वेग मंदावला आहे. तसेच पुढील काही दिवसांत हा वेग आणखी कमी होईल अशी अपेक्षा आयुक्त इकबाल चहल यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिलेले आहे.

- Advertisement -

मुंबईची तुलना इतर शहरांशी केल्यास ठाण्यात रुग्णदुपटीचा कालावधी २५.१३ दिवसांचा आहे. तर पुण्यात तो १९.७ दिवसांचा आहे. त्यामुळे मुंबईची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे.

रुग्ण दुपटीचा दर म्हणजे काय?

रुग्ण दुपटीचा दर किंवा डबलिंग रेट हा कोरोनाच्या रुग्णवाढीचे विश्लेषण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. हा कालावधी जेवढा जास्त असेल तेवढी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले जाते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -