मुंबईतील गृहनिर्माण संस्थाना घरपोच भाजीपाला मिळणार

pravin darekar

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. यातून अत्यावश्यक सेवा जरी गाळण्यात आल्या असल्या तरी रोज लागणाऱ्या फळ, भाजीपाला व इतर गोष्टींसाठी नागरिकांना रोज बाजारात जावेच लागत आहे. यामुळे बऱ्याचदा सोशस डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजत असल्याचे समोर येत आहे. ही चिंतेची बाब असल्याने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुढाकार घेऊन [http://mumbaihousingfederation.com/register-society.php] ही वेबसाईट सुरू केली आहे. ज्यावर मुंबईतील गृहनिर्माण संस्था भाजीपाला, फळ, फुले, अन्न धान्यांची ऑनलाईन ऑर्डर देऊ शकणार आहेत. हे सर्व सामान त्यांना घरपोच मिळणार आहे.

आज शनिवारी दरेकर यांच्या हस्ते या वेबसाईटचा शुभारंभ झूम अॅपच्या माध्यमातून करण्यात आला. याप्रसंगी झूप च्या अँपवर हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, खजिनदार डॉक्टर डी एन महाजन, सचिव ऍड. डी.एस वडेर, ज्येष्ठ संचालक तथा हाऊसिंग टाईम्सचे संपादक वसंतराव शिंदे, ज्येष्ठ संचालिका छायाताई आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दरेकर म्हणाले की राज्याचा विरोधी पक्षनेता असल्याने राज्याच्या हालचालींकडे लक्ष ठेवावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासंबंधी राज्य सरकारला मार्गदर्शक सूचनांबरोबरच सर्वतोपरी सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. झूमच्या अॅपच्या माध्यमातून वेळोवेळी कार्यकर्ते व सरकारी अधिकाऱ्यांच्या आपण संपर्कात असल्याचेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.

तसेच किचन ॲपच्या माध्यमातून हजारोंना भोजन उपलब्ध करून दिले जात असून . या वेबसाईटच्या मार्फत गृहनिर्माण फेडरेशनच्या माध्यमातून ज्यावेळेला गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना सर्व गोष्टी मिळतील तेव्हा हा उपक्रम यशस्वी झाला असे वाटेल असेही दरेकर यावेळी म्हणाले.