घरCORONA UPDATEमुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक कोरोना मुक्त!

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक कोरोना मुक्त!

Subscribe

कोरोनाची बाधा झालेले मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना सोमवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

ठाणे पोलीस दलात कोरोनाने प्रवेश केल्यानंतर पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र सोमवारी ठाणे पोलीस दलाला एक दिलासा देणारी बातमी मिळाली. कोरोनाची बाधा झालेले मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना सोमवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी ठाणे पोलीस दलाचे काही अधिकारी अंधेरी येथील सेव्हन हिल्स येथे दाखल झाले होते. कोरोना या आजाराशी लढा देऊन पूर्णपणे बरे झालेले या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कोरोना या आजारातून बरे झालेले मुंब्रा पोलीस ठाण्याचे हे दुसरे अधिकारी आहेत.

ठाणे पोलीस दलातील ९० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झालेली असून त्यापैकी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या अधिकरी कर्मचारी यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु होता तर जे कोरोनाचे संशयित रुग्ण आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. एकट्या मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तब्बल ३५ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता. त्यापैकी ४ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले होते. या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आजारपणाची सुट्टी घेऊन नाशिक येथे घरी गेले असता त्या ठिकाणी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना तात्काळ मुंबईतील अंधेरी येथे असणाऱ्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर इतर अधिकरी यांना ठाण्यातील रुग्णलायत दाखल करण्यात आलेले होते.

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी तब्बल १५ दिवस कोरोना आजाराशी सामना केला, रविवारी त्यांचे तपासणी करण्यात आली असता त्यात ते निगेटिव्हआले. या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या अधिकाऱ्यांना सोमवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी ठाणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि इतरानी रुग्णालयाच्या आवारातच त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. काही दिवसापूर्वीच मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आणखी एक अधिकारी कोरोना या आजारातून पूर्णपणे बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -