घरमुंबईमंजुरी नसतानाच रेल्वेपुलाच्या कामाचे भूमीपूजन

मंजुरी नसतानाच रेल्वेपुलाच्या कामाचे भूमीपूजन

Subscribe

मुंब्रा-रेतीबंदर येथे रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी उभारण्यात येणारा पुलाचा 7 जुलै रोजी या भूमीपूजन सोहळा पार पाडला. मात्र या पुलाला मंजुरीच नसल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी स्पष्टीकरण दिले असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. त्यामुळेच संदर्भात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

मुंब्रा-रेतीबंदर येथे रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी उभारण्यात येणारा पुलाचा 7 जुलै रोजी या भूमीपूजन सोहळा पार पाडला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका अनिता राजन किणे आणि नगरसेवक राजन किणे यांच्या उपस्थितीत ऋचा आव्हाड यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र या पुलाला मंजुरीच नसल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी स्पष्टीकरण दिले असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. त्यामुळेच संदर्भात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जीव धोक्यात घालून ओलांडावा लागतो रेल्वे रुळ 

मुंब्रा रेतीबंदर येथील नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावे लागत आहेत. या भागातील अनेक नागरिकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे.याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालय तसेच ठाणे महानगर पालिकेशी पत्रव्यवहार केल्यानंतर रेल्वेच्या महानिर्देशकांनी दिलेल्या आदेशानुसार 10 नोव्हेंबर 2017 रोजी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मध्य रेल्वेचे अधिकारी रिझवान अहमद, अशोक सिंह, ठामपाचे कार्यकारी अभियंते धनंजय गोसावी यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन या पुलाची उभारणी करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठीच्या सर्व मंजुर्‍या मिळाल्या असून ठाणे महानगर पालिकेनेही आपल्याकडील निधी वर्ग केला असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकल्पाला रेल्वे प्रशासनाने मंजुरीच दिलेली नाही

मुंब्रा रेतीबंदर येथील पादचारी पुलाचे भूमीपूजन केल्याचा देखावा करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम काही मंडळी करत आहेत. अद्याप या प्रकल्पाला रेल्वे प्रशासनाने मंजुरीच दिलेली नाही. असे प्रकल्प राबवणार्‍या मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. तर या ठिकाणी भुयारी मार्गाचा प्रकल्प असून तो लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. असे शिंदे यांनी जाहीर केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.याबाबत येथील स्थानिक रहिवाशी बाबा भदरगे यांनी सांगितले की, हा केवळ भूमीपुजनाचे श्रेय लाटण्याचा प्रकार आहे. रेतीबंदरला रोड नं.1 वर भुयारीमार्ग आधीपासूनच आहे. त्या भुयारीमार्गाचे डांबरीकरण आवश्यक आहे. ते झाले तर इथून आपत्कालीन परिस्थितीत अँब्युलन्स, फायर ब्रिगेडच्या गाड्यांना देखील तेथील वसाहतींमध्ये जाता येईल. त्यामुळे आता येथे उड्डाणपुलाची आवश्यकता आहे.

- Advertisement -

याबाबत सध्या आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. या प्रकरणी माहिती घेऊन कळवू.

-अनिल पाटील, अतिरिक्त नगर अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे महापालिका.

या पुलाच्या उद्घाटन प्रसंगी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.त्यामुळे प्रकल्पाचे भूमीपूजन रेल्वे विभागाच्या मंजुरीशिवाय कसे होऊ शकते ?

-अनिता किणे, नगरसेविका, अध्यक्षा मुुंब्रा प्रभाग समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -