घरमुंबईKDMC आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी बदलीच्या प्रतिक्षेत, कोरोना काळात फिरकले नाहीत पालिकेत

KDMC आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी बदलीच्या प्रतिक्षेत, कोरोना काळात फिरकले नाहीत पालिकेत

Subscribe

मीरा भाईंदरचा न्याय कल्याणला केव्हा?

कोरोना रुग्ण वाढीचे कारण दाखवत राज्य सरकारने मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची गेल्या आठवड्यातच उचलबांगडी केली. मात्र कल्याण-डोंबिवलीत रोज दोनशे ते अडीचशेच्या संख्येने कोरणा रुग्ण आढळून येत असताना आणि अशा रुग्ण वाढीच्या काळात पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी हे गेले सात दिवस पालिकेत फिरकलेही नसताना , स्वतःच्या बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांची राज्य सरकार कधी बदली करणार असा प्रश्न कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवक तसेच सर्वसामान्य रहिवाशांना पडला आहे. मीरा भाईंदर चा न्याय कल्याण डोंबिवलीला देखील कधी लावणार असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

मीरा भाईंदर महापालिका परिसरात कोरोना रुग्ण वाढत असल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने तेथील पालिका आयुक्तांची गेल्या आठवड्यात अचानक उचलबांगडी करत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यालयातील शासकीय खाजगी सचिव दिलीप ढोले यांची मीरा-भाईंदर पालिका आयुक्त पदी नियुक्ती केली. मात्र दुसरीकडे शिवसेनेची सत्ता असलेल्या आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याबाबत हाच निकष कधी लावला जाणार असा प्रश्न कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवक विचारत आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्याचे नगर विकास मंत्री व ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील सनदी अधिकारी व ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटी ची संपूर्णपणे धुरा सोपवली आहे. या आधी ती पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे होती. मात्र सूर्यवंशी गेल्या दीड पावणे दोन वर्षात कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटी प्रकल्प साठी कोणते भरीव योगदान देऊ न शकल्याची भावना पालक मंत्री एकनाथ शिंदे यांची झाल्याने अखेरीस ठाण्याचे माजी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे स्मार्ट सिटी ची जबाबदारी सोपविण्यात आली. जयस्वाल यांच्याबरोबरच अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर रसाळ यांनाही कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटी मध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. स्मार्ट सिटी च्या प्रकल्पांना गती व चालना मिळावी यासाठी पालकमंत्र्यांकडून या नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगण्यात येते. डॉक्टर रसाळ यांची आता मुख्य नियुक्ती कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटी मध्ये असून अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार ही रसाळ यांच्याकडेच ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

रायगडचे जिल्हाधिकारी असलेले डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती कल्याण-डोंबिवलीचा आयुक्तपदी होताच त्यांनी सुरुवातीला कल्याण-डोंबिवलीत कामकाजाचा धडाका लावला होता. कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाला विरोधी मोहीम, अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीम यामध्ये त्यांनी दोषी पालिका अधिकाऱ्यांना निलंबित करून दणकाही दिला होता.

मात्र त्यानंतर अचानक कोरोनाचे संकट आले आणि त्यात गेले वर्षभर सूर्यवंशींना डोके वर काढता आले नाही. साहजिकच याचा परिणाम कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांवर झाला. स्मार्ट सिटी च्या प्रकल्पांवर झाला. अखेरीस स्मार्ट सिटी ची जबाबदारी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना ज्येष्ठ सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हाती सोपवावी लागली.

- Advertisement -

पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी हे देखील गेल्या काही दिवसांपासून स्वतःच्या बदलीच्या प्रतीक्षेत आहेत असे पालिका वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळेच ते गेल्या आठवड्यात पालिका मुख्यालयात फिरकले नसल्याचेही सांगण्यात येते. मात्र त्यामुळे पालिकेतील नगरसेवकांची नाराजी मात्र वाढत चालली आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिकेचा न्याय पालक मंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवली ला कधी लावणार असा प्रश्न आता नगरसेवक विचारू लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -