घरताज्या घडामोडीमुंबईत विकासकामात बाधक ठरणाऱ्या ४२९ झाडांची कत्तल, पालिकेची परवानगी

मुंबईत विकासकामात बाधक ठरणाऱ्या ४२९ झाडांची कत्तल, पालिकेची परवानगी

Subscribe

सदर समितीच्या बैठकीत एकूण ४ हजार ७०२ झाडांबाबतचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यापैकी ४२९ झाडांची कत्तल करणे, ४२७ झाडे पुनरोपित करण्याला वृक्ष प्राधिकरण समितीने आज मंजुरी दिली.

मुंबईत सध्या विकासकामे जोरात सुरु आहेत. इमारती उभ्या राहत आहेत. अनेक रस्ते आणि बोगद्यांचे कामे सुरु आहेत. तर रस्त्यांवरील उड्डाणपुलांचेही कामे सुरुच आहेत. मेट्रोच्या कामांत अनेक झाडे अडचणीची ठरत आहेत. मुंबईत विविध इमारती बांधकामे, विकासकामे यांना बाधक ठरणाऱ्या ४२९ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. तर त्या बदल्यात दुप्पट म्हणजे ८५८ झाडे नव्याने लावण्यात येणार आहेत अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

वृक्ष प्राधिकरण समितीच्या दोन बैठकीतील एकूण २७ पैकी २४ प्रस्तावांना समिती अध्यक्ष व पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईत सध्या मेट्रो रेल्वे,इमारत बांधकामे, नाले, रस्ते रुंदीकरण आदी कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामांच्या अंतर्गत बाधक ठरणारी ठरणाऱ्या झाडांची कत्तल करण्यात येते. तर आणखीन काही बाधक झाडे मूळ जागेवरून हटवून त्यांना पुनररोपित करण्यात येते.

- Advertisement -

मात्र विकासकामे, बांधकामे यांच्या कामात अडथळा ठरणारी झाडे जागेवरून हटविण्यासाठी पालिका वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी घेणे बंधनकारक असते. त्यानुसार सदर प्राधिकरण समितीच्या बैठकीत कत्तल होणारी झाडे, पुनरारोपित होणारी झाडे आदिबाबतचे प्रस्ताव मंजुरीसाठी आणले जातात. सदर समितीच्या बैठकीत एकूण ४ हजार ७०२ झाडांबाबतचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यापैकी ४२९ झाडांची कत्तल करणे, ४२७ झाडे पुनरोपित करण्याला वृक्ष प्राधिकरण समितीने आज मंजुरी दिली.


हेही वाचा : Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचे 5708 नवे रुग्ण; 12 रुग्णांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -