घरCORONA UPDATEमहापालिकेकडून कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांची लपवाछपवी, विभागनिहाय आकडेवारी नाहीच!

महापालिकेकडून कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांची लपवाछपवी, विभागनिहाय आकडेवारी नाहीच!

Subscribe

सत्य बाहेर येण्याच्या भीतीने विभागनिहाय संख्या प्रदर्शित न करण्याचा प्रयत्न

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून आधीच महापालिका आणि शासनाच्या आकडेवारीत तफावत असतानाच आता महापालिकेने रुग्णांची संख्याच लपवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मागील आठ दिवसांपासून महापालिकेने विभाग निहाय कोरोनाग्रस्तांची आकडेवारी प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक विभागांमध्ये कोरोनाग्रस्तांची नेमकी आकडेवारी समोर येत नाही. त्यामुळे सत्य बाहेर येईल या भीतीनेच कोरोना रुग्णांचा आकड्यांचा खेळ करत एकप्रकारे महापालिका प्रशासन रुग्णांची लपवाछपवी करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची माहिती प्रत्येक विभागनिहाय महापालिकेच्यामाध्यमातून आलेख द्वारे प्रदर्शित केली जायची. महापालिकेच्या अधिकृत टि्वटरवर ही माहिती प्रदर्शित करून प्रसिध्दी माध्यमांनाही ही आकडेवारी दिली जायची. परंतु दैनंदिन कोरोनाग्रस्तांची अचूक माहिती दिल्यामुळे महापालिकेचे पितळ उघडे पडू लागल्याने, काही विश्लेषकांच्या मदतीने या आकड्यांचा खेळ करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. त्यामुळे टि्वटर व प्रसिध्द माध्यमांना दिली जाणारी खरी आकडेवारी प्रदर्शित न करण्याचा  निर्णय महापालिकेने घेतल्याचे बोलले जात आहे.  मुंबईत आज महापालिकेच्या अहवालानुसार ७६२५ कोरोनाचे रुग्ण असून एकूण २९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या प्रभादेवी,वरळी या जी-दक्षिण विभागात १५ एप्रिल रोजी  ३९० रुग्ण दर्शवले गेले होते. परंतु १६ एप्रिल रोजी ही आकडेवारी ३८८ आणि त्यानंतर १७ एप्रिल रोजी ३८९ कोरोना रुग्ण असल्याचे दर्शवले गेले. एका बाजुला या विभागात दिवसाला सरासरी ५० रुग्ण सापडत असताना तिन दिवसांच्या अहवालामध्ये महापालिकेच्या काही कॉर्पोरेट विश्लेषकांनी आकडेमोड करत या विभागातील रुग्णांची संख्या कमी करण्याचे काम केले होते. परंतु हा आकड्यांचा घोळ समोर आल्याने महापालिकेने यापुढे अशाप्रकारची आकडेवारी प्रसारमाध्यमांना न देता, प्रत्यक्षात संख्या वाढत असतानाही प्रत्यक्षात ती कागदावर नियंत्रणात आणल्याचे कशाप्रकारे दर्शवता येईल याचा विचार केला. मात्र, तेव्हा लपवली जाणारी ही आकडेवारी लपवली जात असल्याचेच दिसून येत आहे.

महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, काही विभागांच्या सहायक आयुक्तांनाच आपल्या विभागातील कोरोनाग्रस्तांची संख्या माहित नसते. तसेच त्यांना विभागातील आकडेवारी ही हेड ऑफीसमधून जी अंतिम असेल ती सांगावी,अशाप्रकारचे निर्देश आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात महापालिका प्रदर्शित करत असलेली आकडेवारी आणि विभागातून मिळणारी आकडेवारी यामध्ये बरीच तफावत दिसून येत आहे. याशिवाय आता तर ही आकडेवारी लपवतानाच ज्या विभागांमध्ये ज्या नजिकच्या वॉर्डात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी आहे, त्या वॉर्डात बाजुच्या वॉर्डातील कोरोना रुग्णांची आकडेवारी जोडून त्या वॉर्डातील रुग्णांची संख्या कमी दर्शवली जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. आजुबाजुच्या वॉर्डामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जोडण्यासाठी प्रशासनाकडून  रुग्णांची संख्या लपवली जात असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे दादर,माहिम आणि धारावी या जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आपल्या विभागातील कोरोना रुग्णांची संख्या प्रसारमाध्यमांना जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देत. परंतु त्यांनीही शुक्रवारपासून ही आकडेवारी न देण्याचा पावित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे २०१०मध्ये मुंबईत पसरलेल्या मलेरियाच्या साथीच्या आजाराच्या वेळीही सुरुवातीला अचुक आकडेवारी देणाऱ्या महापालिका प्रशासनाने पुढे ही आकडेवारी कमी दर्शवण्याचा प्रयत्न केला होता. तोच फॉर्म्युला आता कोरोनाच्या वेळी लागू करण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘आम्ही कामावर येवू, पण राहण्याची व्यवस्था करा’, कर्मचाऱ्यांची सरकारकडे मागणी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -