घरमुंबईकरोनाग्रस्तांच्या आकड्यांची लपवाछपवी

करोनाग्रस्तांच्या आकड्यांची लपवाछपवी

Subscribe

सत्य बाहेर येण्याच्या भीतीने संख्या न दाखवण्याचा महापालिकेचा प्रयत्न

मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या वाढत असून आधीच महापालिका आणि शासनाच्या आकडेवारीत तफावत असतानाच आता महापालिकेने रुग्णांची संख्याच लपवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मागील आठ दिवसांपासून महापालिकेने विभागनिहाय करोनाग्रस्तांची आकडेवारी प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक विभागांमध्ये करोनाग्रस्तांची नेमकी आकडेवारी समोर येत नाही. त्यामुळे सत्य बाहेर येईल या भीतीनेच करोना रुग्णांच्या आकड्यांचा खेळ करत एकप्रकारे महापालिका प्रशासन रुग्णांची लपवाछपवी करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईमध्ये करोना रुग्णांची माहिती प्रत्येक विभागनिहाय महापालिकेच्या माध्यमातून आलेखद्वारे प्रदर्शित केली जात होती. महापालिकेच्या अधिकृत ट्विटरवर ही माहिती प्रदर्शित करून प्रसिद्धी माध्यमांनाही ही आकडेवारी दिली जायची. परंतु, दैनंदिन करोनाग्रस्तांची अचूक माहिती दिल्यामुळे महापालिकेचे पितळ उघडे पडू लागल्याने, काही विश्लेषकांच्या मदतीने या आकड्यांचा खेळ करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे ट्विटर व प्रसिद्धी माध्यमांना दिली जाणारी खरी आकडेवारी प्रदर्शित न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याचे बोलले जात आहे. मुंबईत शनिवारी आलेल्या महापालिकेच्या अहवालानुसार ७६२५ करोनाचे रुग्ण असून २९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या प्रभादेवी, वरळी या जी-दक्षिण विभागात १५ एप्रिल रोजी ३९० रुग्ण दर्शवले गेले होते. परंतु, १६ एप्रिल रोजी ही आकडेवारी ३८८ आणि त्यानंतर १७ एप्रिल रोजी ३८९ करोना रुग्ण असल्याचे दर्शवले गेले. एका बाजूला या विभागात दिवसाला सरासरी ५० रुग्ण सापडत असताना तीन दिवसांच्या अहवालामध्ये काही कॉर्पोरेट विश्लेषकांनी आकडेमोड करत या विभागातील रुग्णांची संख्या कमी करण्याचे काम केले होते. परंतु, हा आकड्यांचा घोळ समोर आल्याने महापालिकेने यापुढे अशाप्रकारची आकडेवारी प्रसार माध्यमांना न देता, प्रत्यक्षात संख्या वाढत असतानाही प्रत्यक्षात ती कागदावर नियंत्रणात आणल्याचे कशाप्रकारे दर्शवता येईल याचा विचार केला. मात्र, तेव्हा लपवली जाणारी ही आकडेवारी आताही लपवली जात असल्याचेच दिसून येत आहे.

महापालिकेच्या निवृत्त अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, काही विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनाच आपल्या विभागातील करोनाग्रस्तांची संख्या माहीत नसते. तसेच त्यांना विभागातील आकडेवारी ही हेड ऑफिसमधून जी अंतिम असेल ती सांगावी, अशाप्रकारचे निर्देश आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात महापालिका प्रदर्शित करत असलेली आकडेवारी आणि विभागातून मिळणारी आकडेवारी यामध्ये बरीच तफावत दिसून येत आहे. याशिवाय आता तर ही आकडेवारी लपवतानाच ज्या विभागांमध्ये ज्या नजीकच्या वॉर्डात करोनाग्रस्तांची संख्या कमी आहे. त्या वॉर्डात बाजूच्या वॉर्डातील करोना रुग्णांची आकडेवारी जोडून त्या वॉर्डातील रुग्णांची संख्या कमी दर्शवली जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

आजुबाजूच्या वॉर्डामध्ये करोनाग्रस्तांची संख्या जोडण्यासाठी प्रशासनाकडून रुग्णांची संख्या लपवली जात असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे दादर, माहिम आणि धारावी या जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आपल्या विभागातील करोना रुग्णांची संख्या प्रसार माध्यमांना जनसंपर्क अधिकार्‍यांच्या माध्यमातून देत. परंतु, त्यांनीही शुक्रवारपासून ही आकडेवारी न देण्याचा पावित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे २०१० मध्ये मुंबईत पसरलेल्या मलेरियाच्या साथीच्या आजाराच्या वेळीही सुरुवातीला अचूक आकडेवारी देणार्‍या महापालिका प्रशासनाने पुढे ही आकडेवारी कमी दर्शवण्याचा प्रयत्न केला होता. तोच फॉर्म्युला आता करोनाच्या वेळी लागू करण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -