घरताज्या घडामोडीमुंबईत कोरोना लसीकरणासाठी पालिकेची 'ब्ल्यू प्रिंट'

मुंबईत कोरोना लसीकरणासाठी पालिकेची ‘ब्ल्यू प्रिंट’

Subscribe

पहिल्या टप्प्यात सवा लाख डॉक्टर,आरोग्य कर्मचाऱ्यांना, दुसऱ्या टप्प्यात पोलीस, 'बेस्ट' आणि कोविड संदर्भात काम करणारे कर्मचारी यांना तर तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिकांना आणि इतर आजार असलेल्यांना लस देण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोनाचे लसीकरण निर्विघ्न पार पाडण्यासाठी “टास्क फोर्स” ची महत्वपूर्ण बैठक आज पालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत कोरोना लसीकरणाबाबतची “ब्ल्यू प्रिंट” तयार असल्याचे सांगण्यात आले. मुंबईत पाच टप्प्यात कोरोना लसीकरण होणार आहे. अगदी पहिल्या टप्प्यात सवा लाख डॉक्टर,आरोग्य कर्मचाऱ्यांना, दुसऱ्या टप्प्यात पोलीस, ‘बेस्ट’ आणि कोविड संदर्भात काम करणारे कर्मचारी यांना तर तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिकांना आणि इतर आजार असलेल्यांना लस देण्यात येणार आहे. मात्र ही लस मोफत देणार की कसे याबाबत केंद्र व राज्य सरकार यांच्याकडून प्राप्त सुचनेवरूनच निर्णय घेण्यात येणार आहे. पालिकेच्या चार मोठ्या रुग्णालयांमध्येही लस साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज यंत्रणा तयार आहे, असे सुरेश काकाणी यांनी यावेळी सांगितले.

वास्तविक, आठ ठिकाणी लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नायर, केईएम, सायन या प्रमुख रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच, कुर्ला भाभा, राजावाडी, वांद्रे भाभा आणि जोगेश्‍वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात आणि जंबो कोविड केंद्र या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती काकाणी यांनी दिली. सध्या मुंबईत कोरोना नियंत्रणात आहे. मात्र यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, लस साठवणूक करण्यासाठी कांजूरमार्ग, गोरेगाव, दक्षिण मुंबई या तीन जागा निवडण्यात आल्या आहेत. लस साठवणूक क्षमता सर्वात जास्त प्रमाणात कांजूरमार्ग येथील आरोग्य केंद्रात असणार आहे. येथून सर्वत्र कोरोनावरील लस वितरित केली जाणार आहे. यासंदर्भातील माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. शीला जगताप यांनी दिली.

- Advertisement -

पालिकेतर्फ़े मुंबईकरांना कोरोनावरील लस देण्यात येणार असली तरी ही लस घेणाऱ्या प्रत्येकाची नोंद केंद्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या मोबाईल अँपवर करण्यात येणार आहे. रजिस्टर मोबाईल नंबर नोंदणी केल्यानंतर अँपवर ओटीपी येईल. यानंतर पुढील प्रक्रिया पार पडेल. त्याचप्रमाणे, लसीकरण केंद्रावर ओळख करणे, लस देणे, मदतनीस, सुरक्षा व एक अतिरिक्त असे पाच कर्मचारी असणार आहेत.

महापालिका पाच टप्प्यात लसीकरण करणार आहे. अगोदर कोल्ड स्टोरेज यंत्रणा, शितपेट्या व्यवस्था करणे, निर्धारित तापमानात लसींची व्हॅक्सिनेशन सेंटरपर्यंत वाहतूक करणे, व्हॅक्सिनेशन सेंटर प्रत्यक्ष कामासाठी तयार ठेवणे,
प्रत्यक्ष लसीकरण सुरू करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण. २१ ते २८ दिवसानंतर दुसरा डोस देणे अशा प्रकारे लसीकरण होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लालबाग गॅस दुर्घटना: मृतांची संख्या ५ वर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -