घरCORONA UPDATEमहापालिका सभा, स्थायी समितीची बैठक त्वरीत घ्या; विरोधी पक्षाची मागणी

महापालिका सभा, स्थायी समितीची बैठक त्वरीत घ्या; विरोधी पक्षाची मागणी

Subscribe

गटनेत्यांची बैठक आणि स्थायी समितीची बैठकही त्वरीत घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबई महापालिकेची सभा मार्चपासून अद्यापही पार पडलेली नाही. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची मते तसेच त्यांच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी महापालिकेची सभा विनाविलंब घेण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. याबरोबरच गटनेत्यांची बैठक आणि स्थायी समितीची बैठकही त्वरीत घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई महापालिकेची या वर्षातील शेवटची सभा १७ मार्च रोजी पार पडली आहे. या सभेत महापालिका आयुक्तांनी कोरोनासंदर्भात निवेदन केले होते. त्यानंतर आजमितीस महापालिकेची एकही सभा झालेली नसल्याने कोणत्याही समस्या, प्रश्न तसेच प्रस्तावांसंदर्भात चर्चा झालेली नाही. महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत कोरोनाच्या विषाणुचा संसर्ग सर्वाधिक होत असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची मते, प्रश्नांचा विचार करण्यासाठी महापालिकेची सभा होणे आवश्यक आहे. पावसाळा सुरु झाला आहे.पण मान्सुन पूर्व कोणती उपाय योजना,कामे महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेली आहेत. याबाबत सर्वच नगरसेवक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेणे हे गंभीर असून यासाठी गटनेते व महापालिकेच्या सभेचे आयोजन विनाविलंब करण्यात यावे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच मान्सूनपूर्व उपायायेजनांवर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी  विरोधी पक्षनेते रवी राजा, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

तर महापालिका स्थायी समितीची शेवटची सभा ३१ मार्च रोजी पार पडली. परंतु त्यानंतर कोरोना संदर्भात तसेच मान्सूनपूर्व कामांसंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थायी समितीही सभा विनाविलंब घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -