कोरोना नियमांचे पालन करून शाळा भरणार, पालिकेचं विद्यार्थ्यांच्या संरक्षणाला प्राधान्य

पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता असून ही कोरोनाची चौथी लाट असणार आहे. त्यामुळे पालिका शिक्षण खात्याने आता १३ जून रोजीपासून सुरू करण्यापूर्वी शाळांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.

Educational quality policy required in the state
शैक्षणिक दर्जाचे धोरण राज्यात आवश्यक

मुंबईत एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असून कोरोनाची चौथी लाट उंबरठ्यावर आली आहे. तर दुसरीकडे १३ जूनपासून मुंबईतील सर्व शाळा सुरू होणार आहेत. मात्र कोरोनाचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी त्यांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. पालिकेच्या सर्व शाळांमध्ये कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे केले जाणार आहे. यासंदर्भातील माहिती पालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात मुंबईत कोरोना बाधित १,२४२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता पालिका आरोग्य यंत्रणाही चांगलीच कामाला लागली आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आलेला आहे. अशा परिस्थितीत काही बेफिकीर नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. १३ जूनपासून मुंबईतील शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे पालिका शिक्षण विभागही अलर्ट झाले आहे. कोरोना सुरू झाल्यापासून कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या. मात्र पालिका आरोग्य यंत्रणेने कोरोनाच्या तिन्ही लाटांचा मुकाबला करून त्या परतवून लावल्या. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता असून ही कोरोनाची चौथी लाट असणार आहे. त्यामुळे पालिका शिक्षण खात्याने आता १३ जून रोजीपासून सुरू करण्यापूर्वी शाळांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. महापालिका शाळांत येणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत पालिकेच्या ५०० शालेय इमारतींचे सॅनिटायझेशन पुढील ६ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या गेटवर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत मास्क देण्यात येणार असल्याचे शिक्षण अधिकारी कंकाळ यांनी सांगितले. शाळांमध्ये ऑक्सिमीटर, सॅनिटायझरची व्यवस्था, विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

पालिकेच्या १,१४७ शाळा असून तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका वर्गात ४० ते ५० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर वापर, हात सतत धुणे आदी नियमांचे पाळण करण्यात येणार आहे.


हेही वाचा : कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो, देशमुख-मलिकांच्या मतदानाला ईडीचा विरोध