घरमुंबई‘व्हीसी फेलो’ योजनेला ‘मुनोवा’चा विरोध

‘व्हीसी फेलो’ योजनेला ‘मुनोवा’चा विरोध

Subscribe

विद्यापीठाचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन असून, विद्यार्थ्यांच्या पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोप ‘मुंबई विद्यापीठ ऑफिसर्स वेल्फेअर असोशिएशन’(मुनोवा)ने करत ‘व्हीसी फेला’ला तीव्र विरोध केला आहे.

कुलगुरूंसोबत विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळावी यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे ‘व्हीसी फेलो’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील परिपत्रकही त्यांनी काढले. मात्र विद्यापीठाचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन असून, विद्यार्थ्यांच्या पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोप ‘मुंबई विद्यापीठ ऑफिसर्स वेल्फेअर असोशिएशन’(मुनोवा)ने करत ‘व्हीसी फेला’ला तीव्र विरोध केला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदवीधर उमेदवारांना सार्वजनिक क्षेत्रातील कामकाजाचा अनुभव मिळावा यासाठक्ष ‘सीएम फेलो’ ही योजना आणली होती. याच धर्तीवर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनीही ‘व्हीसी फेलो’ ही योजना राबविण्याचा विचार गतवर्षी मांडला होता. त्याला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिल्यानंतर २२ डिसेंबरला ‘व्हीसी फेलो’ संदर्भातील परिपत्रक काढले. मात्र अशा प्रकारची कोणताही तरतूद विद्यापीठ अनुदान आयोग किंवा महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात नाही. तसेच या फेलोसाठी वार्षिक वेतनापोटी १० लाख ८० हजार रुपयांचा निधी लागणार आहे. कोरोनामध्ये विद्यापीठाची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना विद्यार्थ्यांच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी, तसेच विद्यापीठात अधिकारी व कर्मचारी वर्ग असूनही या फेलोची आवश्यकता का असा प्रश्न मुनोवाने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -