नाशकात पुन्हा हत्या; दगडाने ठेचलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

पोलीस यंत्रणेला गुन्हेगार देताय आवाहन

शहर पोलीस हद्दीत सलग तिसऱ्या दिवशी हत्यासत्र सुरूच असून गुन्हेगार पोलीस प्रशासनाला आव्हान देत राहवत की काय असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहतोय.


मागील दोन दिवसातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीत महिलेची फावड्याने ठेचून हत्या झाली त्यानंतर म्हसरूळ येथील युवकाची भोकसून हत्या झाली होती. या दोन घटना ताज्या असतानाच आता पौर्णिमा बस स्टॉप येथे पुण्याच्या एका व्यक्तीचा मृतदेह ठेचलेल्या अवस्थेत आढळून आल्याने नाशकात खळबळ उडाली आहे…

सविस्तर वृत्त असे की आज (दि.२०) पहाटे चार वाजेच्या सुमारास टोळक्याने नाशिक रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पौर्णिमा बस स्टॉप समोरच भास्कर पाटील (४४,रा. फ्लॅट नंबर 10, सुयश सहकारी संस्था, पश्चिमरंग सोसायटी जवळ, युनिव्हर्सल हाऊस जवळ, वारजे जकात नाका, पुणे) यांचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वपोनी साजन सोनवणे, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता मयत पाटील यांना दगडाच्या सहाह्याने मारले असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून भद्रकाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.