विक्रोळीमध्ये डिलिव्हरी बॉयची हत्या

विक्रोळीमध्ये हॉटेलमधील डिलिव्हरी करायला जात असताना त्यावेळी डिलिव्हरी बॉयची हत्या केली. लुटण्याच्या हेतूने ही हत्या केला अंदाज पोलिसांनी सांगितला आहे.

पूर्व उपनगरात हत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठवड्यात घाटकोपर ह्या ठिकाणी उद्यानात वाढदिवस साजरा करत असताना त्यावेळी नितेश सावंत ह्या युवकाची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असताना त्यात आता विक्रोळीत शनिवारी रात्री ९:३० वाजल्याच्या दरम्यान विक्रोळी कन्नमवार नगर एक येथील रेड चिली हॉटेलमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करणाऱ्या तेज कुमार राम या २२ वर्षीय युवकावर धार धार शस्त्राने हल्ला करत हत्या केली. विक्रोळी सर्व्हिस रोड लगत असलेल्या भुयारी मार्गावर हि घटना घडली आहे.

तेज कुमार राम हा सर्व्हिस रोड वरून हॉटेल मधील जेवणाची डिलिव्हरी करण्यासाठी टागोरनगर या ठिकाणी जात होता. त्याचवेळेस हॉटेल माघील जवळील असलेल्या सर्व्हिस रोड लगत भुयारी मार्गातून सायकलवरून जात असताना दोन जणांनी त्याचा रस्ता आडवला आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला जवळील महात्मा फुले रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा आधीच त्याला मृत घोषित केलं.

आरोपींची ओळख अद्याप ही पटली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. लुटण्याच्या हेतूने ही हत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. तेज कुमार राम हा गायक सुद्धा होता. त्याचे अनेक व्हिडिओ हे युट्यूबवर आहेत. पूर्व उपनगरात गुन्हेगारी वाढत असून पोलिसांचा वचक आता उरला नसल्याचं सामान्य नागरिक बोलत आहेत.