Eco friendly bappa Competition
घर मुंबई मीरा रोडमधील महिलेची हत्या : चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा, म्हणाल्या...

मीरा रोडमधील महिलेची हत्या : चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा, म्हणाल्या – सरड्याला पण…

Subscribe

मुंबई : दिल्लीतील श्रद्धा हत्या काडांचे पडसाद मुंबईतील मीरा रोडमध्ये उमटले आहेत. मीरा रोडमधील नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३२ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेला आता राजकीय रंग चढू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त करत आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. सुळेंच्या या मागणीनंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. (Murder of a woman in Mira Road: Chitra Wagh targets Supriya Sule, said – Lizard but…)

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हटले की, सुप्रिया सुळे तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल… किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो. तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत. मुलीला मुस्लिम तरूणाने पळवून नेले. ती अडीच वर्ष सापडली नाही. तेव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं. श्रद्धा वालकर प्रकरणात तुम्ही वेळीच लक्ष दिले असते तर तिचेही 35 तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच! मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस या सक्षम नेत्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरीचे अश्रू’ गाळण्याची गरज नाही, मोठठ्या ताई…, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. चित्र वाघ यांनी हे ट्वीट करताना एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, भाजपा महाराष्ट्र यांना टॅग केले आहे. 

- Advertisement -

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटले की, मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे. गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याचे गृहमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करताना सीएमओ महाराष्ट्र ट्विटरला टॅगही केले आहे.

- Advertisement -

 दरम्यान, मीरा-भाईंदर रोडच्या गीता नगर फेस -७ मधील गीता आकाश दिप बिल्डिंगच्या जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये मागील तीन वर्षांपासून एक जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यात मनोज सहानी (56) आणि मृत सरस्वती वैद्य (32) हे राहत होते. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणांमुळे सतत भांडणं होत होती. त्यामुळे आरोपी मनोज सहानी याने करवतीच्या (आरी) साहाय्याने सरस्वतीचे तुकडे करून काही तुकडे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर काही तुकडे कुकरमध्ये शिजवून रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घातले.

शरीराचा अर्धा भाग हा घरातच असल्यामुळे दुर्गंधी येऊ लागली. तसेच मनोजच्या संशयास्पद हालचालीवरुन त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा उघडला असता हा धक्कादायक प्रकार त्यांच्या समोर आला. त्यानंतर पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनोजला ताब्यात घेतले. सहानी यांचा अधिक तपास केला जात आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नयानगर पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती मीरा-भाईंदर परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

 

- Advertisment -