घरमुंबईमंदिराबाहेर भीक मागणारीच्या नावावर चार फ्लॅट

मंदिराबाहेर भीक मागणारीच्या नावावर चार फ्लॅट

Subscribe

रस्त्यावर भीक मागणार्‍यांपैकी अनेक जण खरंच गरीब असतात का? असा प्रश्न निर्माण करणार्‍या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. त्यातल्याच एका घटनेचा उलगडा नुकताच मुंबई पोलिसांनी केला आहे. घाटकोपरमधल्या जैन मंदिराबाहेर भीक मागणार्‍या एका महिलेचा संदिग्ध परिस्थितीत सोमवारी झालेला मृत्यू या सगळ्याला कारणीभूत झाला. तपासानंतर पोलिसांना समजलेले वास्तव धक्कादायक होते. संबंधित महिलेच्या नावावर मुंबईत ४ फ्लॅट आहेत. त्यातले २ चेंबूरमध्ये तर २ वरळीमध्ये आहेत. याच फ्लॅटच्या वादातून या महिलेची तिच्याच सुनेने गळा आवळून हत्या केल्याचे तपासातून समजले आहे. संजना असे ७० वर्षीय मृत महिलेचे नाव असून सुनेचे नाव अंजना असून सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे.

घसरून पडल्याचा कांगावा
सोमवारी संजना यांना मृत अवस्थेत तिचा दत्तक मुलगा आणि त्याची पत्नी अंजना राजावाडी रुग्णालयात घेऊन आले. संजनाचा पाय घसरून ती पडल्याचे तिच्या मुलाने आणि सुनेने रुग्णालयात सांगितले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संजना यांच्या गळ्यावर वळ दिसून आले. तसेच, त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर हळूहळू सत्य परिस्थिती समोर आली.

- Advertisement -

त्या दिवशी नक्की घडले काय?
संजना आणि त्यांची सून अंजना यांच्यात सातत्याने वाद होत असत. अंजनाला संजना यांच्या नावावर असलेले फ्लॅट तिच्या नावावर करून हवे होते. या चारपैकी तीन फ्लॅट त्यांनी भाड्याने दिले असून एका फ्लॅटमध्ये ते स्वत: राहत आहेत. संजना यांनी नकार दिल्यानंतर वारंवार त्यांच्यात वादावादी व्हायला लागली. संजना घाटकोपरमधल्या जैन मंदिराच्या बाहेर बसून भीक मागत होती. त्यातूनच ४ फ्लॅटची संपत्ती जमा झाली होती. याच संपत्तीच्या वादातून अखेर तिची हत्या झाली.सोमवारी त्या दोघींमध्ये वादावादी झाली. अंजनाला राग अनावर झाला आणि तिने संजना यांना क्रिकेट बॅटने मारायला सुरुवात केली. त्यातही समाधान न झाल्यामुळे अंजनाने कपड्यांच्या नाडीने संजना यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. नाडीही तुटल्यानंतर अंजनाने थेट मोबाईल चार्जर घेतला आणि गळा आवळायला सुरुवात केली. अखेर संजना यांचा मृत्यू झाल्यानंतर तिचा राग शांत झाला. हत्या लपवण्यासाठी मग तिने आणि तिच्या पतीने संजना घसरून पडल्याचे नाटक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -