Eco friendly bappa Competition
घर मुंबई बदलापूरमध्ये कौटुंबिक वादातून विवाहितेची हत्या; फरार पतीचा शोध सुरू

बदलापूरमध्ये कौटुंबिक वादातून विवाहितेची हत्या; फरार पतीचा शोध सुरू

Subscribe

बदलापूर : कौटूंबिक वादातून विवाहितेची हत्या झाल्याची घटना बदलापूरमध्ये (Badlapur) उघडकीस आली आहे. राजश्री भोसले (Rajshree Bhosle) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिचा पती गणेश भोसले (Ganesh Bhosle) हा या घटनेनंतर फरार झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. बुधवारी (19 एप्रिल) सकाळी 11 वाजता शेजारच्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

बदलापूरच्या शिरगाव परिसरात असलेल्या राऊत आर्किड इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहणारे गणेश भोसले आणि त्यांची पत्नी राजश्री भोसले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती वादातून अनेकदा भांडणे होत होती. मंगळवारी रात्री सुद्धा नवरा बायकोमध्ये जोरदार भांडण झाल्याचे राजश्री यांनी आपल्या भावाला फोन करून सांगितले होते. याच भांडणातून गणेश याने राजश्रीच्या पोटावर आणि मानेवर चाकूने वार केल्यानंतर राजश्रीचा जागीच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बाळासाहेब अयोध्येला गेले होते हे काहींना पुन्हा दाखवावं लागणार आहे – उद्धव ठाकरे

या घटनेनंतर संशयित आरोपी गणेश हा घरातून पसार झाला आहे. आपल्या आईला राजश्री जेवण देत नव्हती या गोष्टीचा राग मनात ठेऊन गणेशने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. धक्कायदायक बाब म्हणजे गणेशने आपल्या आईच्या फोटोसमोरच राजश्रीची हत्या केली. आपल्या आईकडे दुर्लक्ष केल्याची खदखद गणेशच्या मनात अनेक दिवसांपासून होती; मात्र त्याच्या या कृत्यानंतर त्यांचा सहा वर्षांचा मुलगा मात्र आईच्या मायेला कायमचा पोरका झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेनंतर महिलेचा पती फरार झाला असून त्याचा फोनही बंद येत असल्यामुळे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र ही हत्या का करण्यात आली? याचे कारण समजू शकले नसून बदलापूर पूर्व पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – मुंबई आणि नवी मुंबईत कोरोना वाढला, राज्यात २५ कोविड रुग्णालये पुन्हा होणार सुरू

- Advertisment -